Tarun Bharat

हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तियावर छापे

पंकज मिश्रांवर ईडीकडून अटकेची कारवाई ः दिल्लीत चौकशी होणार

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय नेते पंकज मिश्रा यांना ईडीच्या पथकाने उत्तराखंडमध्ये शुक्रवारी ताब्यात घेतले. निविदा घोटाळय़ाप्रकरणी ईडीने कारवाई केली असून आता त्यांची दिल्लीत चौकशी केली जाणार आहे. शुक्रवारी सकाळी पंकज मिश्रा यांच्या 12 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

ईडीच्या पथकाने शुक्रवारी सकाळपासून निविदा घोटाळय़ाप्रकरणी धनबाद जिह्यात पंकज मिश्रा यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. यासोबतच साहिबगंजमधील मालमत्तांवरही कारवाई करण्यात आली. पहाटे पाच वाजताच छापे टाकण्यास सुरुवात झाली. कारवाईवेळी संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. तसेच सर्वत्र सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आले होते. साहिबगंज जिह्यातील बरहरवा येथे जून 2020 च्या निविदा वादात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा ताबा ईडीने घेतला आहे. बरहारवाचा हा गुन्हा शंभू नंदन कुमार उर्फ शंभू भगत यांनी नोंदवला होता.

Related Stories

हरियाणा : 28 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम; काही निर्बंधांमध्ये सूट

Tousif Mujawar

5 कोटी रुपयांमध्ये मोदींना मारण्यास तयार

Patil_p

यूपीत आज मंत्रिमंडळ विस्तार

datta jadhav

व्यावसायिक सिलिंडर 115 रुपयांनी स्वस्त

Patil_p

दिल्लीत आता नायब राज्यपालांचे सरकार

datta jadhav

नगर जिल्हा रुग्णालयात अग्नितांडव

Patil_p