Tarun Bharat

हेमा बुगडे यांना ‘राष्ट्रीय कौशल्य चार्य 2020’ पुरस्कार प्राप्त

वार्ताहर/ कामुर्ली

जन शिक्षण संस्थेच्या रिसोर्स व्यक्ती हेमा बुगडे यांना ‘राष्ट्रीय कौशल्य चार्य’ पुरस्कार 2020’ जाहीर झाला असून त्यांना तो लवकरच दिल्ली येथे बहाल करण्यात येणार आहे. बुगडे वर्ष 2005 पासून आजतागायत त्यांनी विविध स्वयंसाहाय्य गटांना प्रशिक्षण दिले असून त्या सध्या जन शिक्षण संस्थेत रिसोर्स व्यक्ती म्हणून काम करीत आहेत.

त्यांनी आजपर्यंत गोव्यात विविध प्रकारची विविध गटांना प्रशिक्षण दिले असून त्यात बांबु क्राफ्ट, फिरत्या बाहुल्या बनविणे, शिवण व विणकाम, जुट बॅग्ज, इत्यादीचे शिक्षण विविध स्वयंसहाय्य गटांना दिले. किती तरी स्वयंसाहाय्य गट स्थापन केलेत व त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन पण त्या देताहेत. गोवा सरकार, भारत सरकारच्या व बिन सरकारी संस्था आयोजित विविध प्रदर्शनात भाग घेऊन त्यात सरस गोवा हँडीक्राफ्ट, मध्यप्रदेश हॅण्डी क्राफ्ट, नॉर्थ इस्ट हॅण्डीक्राफ्ट आदी प्रदर्शनात भाग घेतला आहे. तसेच सरकार मान्य संस्थेकडून मुद्रात्रण तसेच महिलांना विविध क्षेत्रात मार्गदर्शन करून महिलांनी स्वतःहा स्वतःच्या पायावर उभं राहून संसाराचा उद्धारासाठी कसे झटावे याचे मार्गदर्शन वेळोवेळी करीत असतात. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

भारतीय जन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्ता नाईक, संचालक श्रीहरी आठल्ये, निमिशा पाल, निनाद वेंगुर्लेकर, इतर जन शिक्षण संस्थेचे कर्मचारी यांच्या सहकार्याने हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हेमा बुगडे यांनी धन्यवाद दिले.

Related Stories

राज्यातील राजकीय सत्तानाट्य संपलं, बहुमताचा डाव शिंदे-भाजप गटाने जिंकला

Rahul Gadkar

निर्णय तत्परता नसल्याने शिक्षणक्षेत्रात गोंधळ

Amit Kulkarni

डय़ुरँड स्पर्धेत आज बेंगलोर एफसी-एफसी गोवा उपान्त्य लढत

Amit Kulkarni

आयुर्वेदच्या वैश्विकरणासाठी योगदान द्यावे

Patil_p

मोती डोंगर कंन्टेमेंन्ट झोन

Patil_p

वीज केबल चोरी प्रकरणी दोघांना अटक

Amit Kulkarni