Tarun Bharat

हेरलेचे सुहास कोरेगावे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड

प्रतिनिधी / कोल्हापूर

हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील सुहास सुकुमार कोरेगावे यांनी राज्य सेवा परीक्षेतून यश मिळवीत सहाय्यक विक्रीकर आयुक्त वर्ग १ पदास गवसणी घातली . शेतकरी कुटुंबातील सुहासने आज पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मंत्रालयान सहाय्यक कक्षाधिकारी, विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (वर्ग १) व सद्या सहाय्यक राज्यकर आयुक्त ( वर्ग १ ) या पाच पदांच्या परीक्षामध्ये यश मिळवून हातणंगले तालुक्यात रचला इतिहास त्यांच्या या अतुलनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

हेरले गावातील सुहासचे वडील सुकुमार कोरेगावे शेती करतात तर आई अक्काताई कोरेगावे घर सांभाळतात या शेतकरी कुटुंबातील दाम्पत्याच्या मुलाने लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेतून यश मिळविले आहे. स्वअध्ययानातून जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन शालेय जीवनातच त्याची सुरूवात झाली .सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय कागलमध्ये पूर्ण झाले. फार्मसी पदवीची प्रवेश परीक्षा पास होऊन पुढील पदवीचे शिक्षण गव्हर्मेन्ट कॉलेज ऑफ फार्मसी कराडमध्ये पूर्ण झाले.
सुहास कोरेगावे यांनी समाजाची सेवा करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याची महत्वकांक्षा मनी बाळगून पुणे येथे अभ्यासासाठी गेले. त्यांनी अहोरात्र अभ्यास करून जिद्द चिकाटीने दिड ते दोन वर्षातच सन २०१२ च्या परीक्षेत राज्यात दुसरा येऊन मंत्रालयीन सहाय्यक कक्षाधिकारी पद मिळविले. सन २०१२ च्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात सहावा गुणाक्रम मिळवून पद मिळविले. सन २o१२ च्या राज्य उत्पादन सहाय्यक आयुक्त पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन एकाच वर्षात झालेल्या परीक्षेमध्ये तीन पदे संपादन केली.तदनंतर २०१३च्या राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (वर्ग १) पद संपादन केले.

तीन पदाचा स्विकार न करता अभ्यासात सातत्य राखत क्लास वन उपमुख्य कार्यकारी पद मिळाल्यानंतर त्यांनी स्विकारून सद्या ते गट विकास अधिकारी(वर्ग -१) पंचायत समिती हिमायतनगर, जि.- नांदेड येथे कार्यरत असून त्यांचा सातत्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू असल्याने त्यांची सन २०१९ च्या राज्यसेवा परीक्षेमध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त पदी निवड झाली. त्यांची पत्नी – सौ. प्रणोती सुहास कोरेगावे. त्यांनीही स्पर्धा परीक्षेतून यश मिळवून सन – २०१०पोलीस उपनिरीक्षक पद मिळविले , सन२०१३ मध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी पदी पास होऊन परभणी जिल्ह्यात गटविकास अधिकारी ( वर्ग १) पदावर पंचायत समिती मानवतमध्ये कार्यरत आहेत.
संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे उज्वल यश व उन्नत्ती.

सुहास कोरेगावे यांचा बंधू श्रेणीक कोरेगावे यांनी केंद्र शासनाच्या शिक्षकपदाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून केंद्रीय विद्यालय पुणे येथे माध्यमिक शिक्षक पदी कार्यरत आहेत. त्यांची वहिनी दिव्या श्रेणीक कोरेगावे या केंद्रीय विद्यालय चाकूर येथे उच्च माध्यमिक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. शेतकरी कुटुंबामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुहास व श्रेणीक या दोन्ही भावांनी यश संपादन करीत त्यांच्या पत्नीनीही स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशस्वी बंधूंना चुलते धनपाल कोरेगावे व जयपाल कोरेगावे यांचे लहानपणा पासून अतापर्यंत मार्गदर्शन व प्रेरणा लाभल्याने गावतील एका शेतकरी कुटुंबातील मुलांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर करिअर करून समाजामध्ये आदर्श निर्माण केला आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सुहास यांनी हे मिळविलेले यश दैदिप्यमान आहे. आपणही अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर ध्येयाने झपाटून जिद्द चिकाटी व अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास नक्कीच आपले ध्येय गाठू शकता. असा त्यांनी आपल्या पाच अधिकारी पदाच्या यशातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून आजपर्यंत पाच पदांच्या परीक्षेत यशस्वी झालो आहे. सद्या गटविकास अधिकारी पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे. या पदाच्या माध्यमातून कर्तव्य बजावत असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सातत्याने सुरू होता. प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पदी काम करतानाच समाजाची सर्वोतोपरी सेवा करण्याचे माझे ध्येय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 सुहास कोरेगावे 

गटविकास अधिकारी ( वर्ग१ )
पंचायत समिती हिमायतनगर, जि. नांदेड.

Related Stories

रेहान गवंडी यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

Patil_p

सातारा : वाढत्या आकडयाने भरतेय धडकी

Archana Banage

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Archana Banage

“राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ”; देवेंद्र फडणवीसांची सत्ताधाऱ्यांवर टीका

Archana Banage

जुलैची रेकॉर्ड ब्रेकच्या दिशेने वाटचाल

Patil_p

आता कर्नाटकात नो एंट्री

Archana Banage