Tarun Bharat

हेलिकॉप्टरचा व्हिडिओ घेणाऱ्यांच्या फोनची तपासणी

प्रतिबंधित क्षेत्र असताना केले चित्रण

कुन्नूर / प्रतिनिधी

जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर निलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी क्षेत्रात अचानक बदललेल्या हवामानामुळे धुक्यात अडकले आणि त्यानंतर त्याचा अपघात झाला. या घटनेनंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून तो कोइंबतूर येथील छायाचित्रकार ज्यो यांनी आपल्या मोबाइल फोनवर चित्रित केला होता. या अपघातावेळी ज्यो आपले काही मित्र आणि काही कुटुंबीयांसमवेत ८ डिसेंबर रोजी घटनास्थळाजवळ हजर होते. ज्यो यांच्या म्हणण्यानुसार त्याला हेलिकॉप्टर खूप जवळ आल्याचा मोठा आवाज आल्यावर त्यांनी धुक्यात अडकलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडिओ चित्रित केला होता.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे ठिकाण सामान्य लोकांसाठी प्रतिबंधित असून ज्यो आणि आणि इतर लोक या प्रतिबंधित क्षेत्रात काय करत होते. त्यामुळे याबाबतही चौकशी केली होत आहे. सध्या पोलिसांनी ज्यो यांचा फोन कोइंबतूरच्या फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवला आहे. जनरल रावत यांच्या मृत्यूच्या तपासात पोलिस प्रत्येक गोष्ट तपासत आहेत.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात बारा नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 28,438 नवे कोरोनाग्रस्त

Tousif Mujawar

एसटी महामंडळाला शासनाची 600 कोटींची मदत

datta jadhav

साखर उद्योगाला पॅकेज देण्यापेक्षा साखरेला चांगला दर द्या- वैभव नायकवडी

Archana Banage

ऐन पावसाळ्यात पाचगावकरांचा पाण्यासाठी रास्ता रोको

Archana Banage

कोल्हापूर : नृसिंहवाडी परिसरात गणरायाचे उत्साहात आगमन

Archana Banage