Tarun Bharat

हेलिकॉप्टर, 1 कोटी रुपये रोख, तीनमजली घराचे आश्वासन

Advertisements

तामिळनाडूतील उमेदवाराच्या अजब घोषणा

मदुराई :  तामिळनाडुतील एका अपक्ष उमेदवाराने स्वतःच्या घोषणापत्रात मतदारांना दिलेली आश्वासने वाचून धक्काच बसतो. निवडणुकीत विजयी झाल्यास मतदारसंघातील सर्व कुटुंबांना एक आयफोन, कार, हेलिकॉप्टर, नौका, रोबोट, जलतरण तलाव असलेले तीनमजली घर देणार असल्याचे या उमेदवाराने सांगितले आहे. याचबरोबर तरुण-तरुणींना एक कोटी रुपये देत लोकांना 100 दिवसांच्या सुटीवर चंद्राची सफर घडवून आणणार आहे. एक अंतराळ संशोधन केंद्र, रॉकेट प्रक्षेपण केंद्र, दक्षिण मदुराई या मतदारसंघातील लोकांना उन्हाळय़ापासून दिलासा देणारा 300 फूट उंचीचा कृत्रिम आइसबर्ग (हिमटेकडी) निर्माण करण्याचे आश्वासन अपक्ष उमेदवाराने दिले आहे. सर्वनन नावाच्या या उमेदवाराचे वय 34 वर्षे असून राजकारणात तरुणाईच्या भागीदारीला प्रोत्साहन देणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. मागील 50 वर्षांमध्ये राजकीय पक्षांनी कल्याणकारी योजनांच्या घोषणा करूनच निवडणुकीत विजय मिळविला आहे. या पक्षांच्या सरकारांनी कधीच सर्वसामान्यांची सेवा केली नाही. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी अव्यवहार्य असलेले घोषणापत्र मांडले असल्याचे सांगणाऱया सर्वननचे निवडणुकीतील चित्र कचरापेटी आहे.

Related Stories

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एक नक्षलवादी ठार

Archana Banage

… तर कोल्हापुरात तांडव होईल; नितेश राणेंचा इशारा

Archana Banage

कोरोना : महाराष्ट्रात मागील 24 तासात 9,350 नवे रुग्ण; 15,176 डिस्चार्ज!

Tousif Mujawar

जपान : फुकुशिमाचे किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडण्यास मंजुरी

datta jadhav

पत्नीने धोका देताच अन्य महिलांचा काढला काटा

Patil_p

मंगळूर विमानतळावर स्फोटके लावल्याप्रकरणी आदित्यराव विरोधात आरोपपत्र दाखल

Tousif Mujawar
error: Content is protected !!