Tarun Bharat

‘हेल्थ वे’ मध्ये टाकेविरहित गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

प्रतिनिधी /पणजी

 गोव्यात पहिल्यांदाच टाकेविरहित गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली असून यामुळे या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. याआधी टाकेविरहित शस्त्रक्रिया झाली असली तरी ऑर्थोपेडिक विभागातील ही पहिलीच शस्त्रक्रिया होती. हेल्थवे इस्पितळाच्या ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ महेंद्र कुडचडकर यांनी त्यांच्या इतर साथीदारांसोबत 70 वषीय महिलेवर टाकेविरहित गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे भविष्यात रुग्णांना शस्त्रक्रिये नंतर व्रण पडणार नाहीत तसेच ते लवकर बरे होतील.

 डॉ महेंद्र कुडचडकर यांनी सांगितले की या वैज्ञानिक प्रगतीमुळे, बाह्य त्वचेवर एकही टाका घातला जात नाही; केवळ शस्त्रक्रियेची इन्सीजन रेष दिसते. एथिकॉनमधील डर्माबॉन्ड रासायनिकदृष्टय़ा सायनोएक्रिलेट ऍडेसिव्हसारखे आहे परंतु मानवांसाठी सुरक्षित आहे आणि जखम बंद करण्यासाठी वापरले जाते. या पद्धतीने नियमित टाके किंवा त्वचेच्या स्टेपल्सची जागा घेतली आहे. स्टेपल 10-12 दिवसात काढावे लागतात, काळजी घ्यावी लागते आणि यामुळे अनेकदा व्रण मागे राहतात.

 टाकेविरहित शस्त्रक्रियेमुळे रुग्ण लवकर बरा होऊन रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज होतो. यामुळे जखमेला त्रास आणि पू निर्माण होत नाही. रुग्ण शस्त्रक्रियेच्या काही तासांच्या आत आंघोळ करू शकतो,. रुग्णांना टाके काढताना होणाऱया वेदना आणि भीतीपासून मुक्तता मिळते.

Related Stories

मंत्र्यांचा जोरदार प्रचार, विरोधकांची सतावणूक

Patil_p

भरमसाठ वीजबिलाविरोधात काँग्रेसची सोशलमीडिया चळवळ

Omkar B

पी. ए. सूर्यवंशी यांचा आदर्श सवांनी घ्यावा

Amit Kulkarni

कलंगुट येथे स्पेअर पार्टच्या दुकानाला आग

Patil_p

खांडोळा उच्च माध्यमिकसाठी सुसज्ज इमारत उभारणार

Patil_p

सरकारकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी, सर्वोच्च न्यायालयात जनतेचाच विजय होणार- संकल्प आमोणकर

Amit Kulkarni