Tarun Bharat

हेल्मेट सक्तीआधी जागरुकता निर्माण करा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून जिह्यात येत्या 15 डिसेंबरपासून हेल्मेट सक्ती करण्याच्या झालेल्या रस्ता सुरक्षा बैठकीतील निर्णयाचे आदेश निघाले व ते त्वरित सोशल मिडियावर सर्वत्र फिरले. सोशल मिडियाच्या माध्यमातून तत्काळ नागरिकांकडून या हेल्मेट सक्तीविरोधात उमटलेल्या प्रतिक्रिया, त्या जनभावनेची दखल घेत जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून ‘हेल्मेट सक्ती’ला राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी स्थगिती दिली आहे.

  रत्नागिरी जिह्यात काही महिन्यांपूर्वी तत्कालीन प्रशासकीय यंत्रणेकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. त्यावरून विशेषतः शहरी भागातील नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत होते. त्यानंतर ही सक्ती पोलीस यंत्रणेकडून शिथिल करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. पण 6 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी प्रशासनाच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सुरक्षा समितीची बैठक पार पडली. बैठकीत जिल्हय़ातील सर्व शासकीय किंवा निमशासकीय आस्थापनांमध्ये काम करणाऱया व दुचाकी वाहनांवरून प्रवास करणाऱया अधिकारी व कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱया अभ्यागतांना तत्काळ हेल्मेट सक्ती करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्या सक्तीबाबत निर्णयही घेण्यात आला.

 त्यानंतर रत्नागिरीत पुन्हा एकदा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडून जिह्यात हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश निघाले. हे काढण्यात आलेले आदेश त्वरित सोशल मिडियावर सर्वत्र फिरले. सोशल मिडियाच्या माध्यमातून तत्काळ नागरिकांकडून या हेल्मेट सक्तीविरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या. विशेषतः शहरी भागातील नागरिकांनी या सक्तीविरोधात प्रत्यक्षही प्रतिक्रिया दिल्या गेल्या. पोलीस प्रशासनाने हेल्मेटबद्दल जागरूकता निर्माण करावी पण सक्ती करू नये, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आल्या.

  प्रशासनाकडून दिलेल्या आदेशाबद्दल येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून आपल्या जिह्याबद्दल नेहमीच संवेदनशील असलेल्या राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ दखल घेतली. रत्नागिरीतील जनभावनेचा विचार करून सामंत यांनी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केली. दिलेल्या हेल्मेट सक्तीच्या आदेशाला तत्काळ स्थगिती दिली. पालकमंत्री उदय सामंत यांनी त्वरित घेतलेल्या या निर्णयामुळे शहरी भागातील नागरिकांनी सुटपेचा निःश्वास टाकला आहे.

Related Stories

रवींद्र चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपकडून आनंदोत्सव

Anuja Kudatarkar

तिसंगीत दारू धंद्यावर धाड, ३ लाख ३० हजाराचा ऐवज जप्त

Archana Banage

अग्निशमन केंद्र नऊ वर्षे रखडले

NIKHIL_N

“शिवसेनेची हालत ‘या’ बॅनरसारखीच”

Archana Banage

`डेल्टा’चा राज्यातला पहिला मृत्यू रत्नागिरीत

Archana Banage

पॉझिटीव्ह नवरदेव चढले बोहल्यावर!

Amit Kulkarni