Tarun Bharat

हेल्मेट सक्तीची कार्यवाही सुरू

दुचाकीस्वारांबरोबर मागे बसणाऱयांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक

प्रतिनिधी/ बेळगाव

दुचाकीस्वाराला हेल्मेटची सक्ती केल्यानंतर आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तिलाही हेल्मेटची सक्ती लागू करण्यात आली असून त्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. प्रथम दुचाकीस्वारांना नियमाची माहिती देऊन सोडून देण्यात आले आहे. मात्र, येत्या काही दिवसातच ही कारवाई तीव्र करणार असल्याची माहिती आरटीओ शिवानंद मगदूम यांनी दिली. मात्र, या जाचक कारवाईच्या विरोधात बेळगावची जनता गप्प बसणार का? हे लवकरच समजणार आहे.

यापूर्वी हेल्मेट नसेल तर 1 हजार रुपये दंड आकारण्यात येत होता. आता एक हजार रुपयांबरोबरच हेल्मेट नसेल तर तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द करण्याचा नवीन नियम लागू झाला आहे. याचबरोबर दुचाकी चालकासह पिलीयन रायडरलाही हेल्मेट सक्तीचे असणार आहे. याबाबत पोलीस अधिकाऱयांना सूचना देण्यात आल्या असून ही कारवाई लवकरात लवकर सुरू होणार आहे. मात्र, याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीचालकाला आणि दुचाकीवर मागे बसणाऱयालाही हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे हेल्मेट नसेल तर मोटार वाहन कायदा 1988 नुसार कलम 194-डी अन्वये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे आता दुचाकीस्वार व त्याच्या पाठीमागे बसणाऱया व्यक्तिलाही दंड बसणार आहे. राज्य सरकारने मागील 5 दिवसांपूर्वी हा नियम काढला होता. मात्र, बेळगावात त्याची अंमलबजावणी केव्हा, याकडेच साऱयांच्या नजरा लागून होत्या. आता हा नियम लागू करण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून बेळगाव आरटीओ कार्यालयात यासंबंधी पत्र पाठविण्यात आले आहे. हा नवीन नियम बेळगावात लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील अधिकाऱयांनी मंगळवारपासून हा नियम बेळगावात सुरू करण्यात आल्याचे सांगितले. हेल्मेट नसलेल्यांना 1 हजार तर वाहन विमा नसलेल्या चालकाला दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हेल्मेट नसल्यामुळे अनेकांचा मृत्यू डोक्मयाला जबर इजा पोहोचल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता दुचाकी चालकासह पिलीयन रायडरलाही हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे.

2019 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेल्या मोटार वाहन कायद्यात याबाबतची तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकारने हा निर्णय घेऊन तसे पत्रकही जाहीर केले होते. दि. 20 ऑक्टोबर रोजी याबाबतचे पत्रक काढण्यात आले होते. तब्बल सात दिवसांनंतर या कलमाची अंमलबजावणी बेळगावात झाली आहे. त्यामुळे यापुढे दुचाकी चालकासह मागे बसणाऱया व्यक्तीनेही हेल्मेट परिधान करणे गरजेचे बनले आहे. अन्यथा, तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द करण्यात येणार असून 1 हजार रुपये दंडही ठोठावण्यात येणार आहे.

नियमाची अंमलबजावणी सुरू : आरटीओ शिवानंद मगदूम

बेळगाव शहर व परिसरात कलम 194-डी लागू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे मंगळवारपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. बेळगाव पोलिसांना याबाबतच्या सूचना करण्यात येणार आहेत. सध्या कोरोनामुळे अनेक संकटांतून आरटीओ कार्यालयाचा कारभार जात आहे. महसुलात घट झाली आहे. त्यामुळे महसूल वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरूच आहेत. आता सरकारने दिलेल्या आदेशानुसार नवीन नियम लागू करण्यात आला आहे. मंगळवारपासून त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे,अशी माहिती आरटीओ शिवानंद मगदूम यांनी दिली.  

Related Stories

भुतरामहट्टीत वाढणार पर्यटकांचा ओघ

Amit Kulkarni

कल्लेहोळ येथे ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

Omkar B

श्री सरस्वती को-ऑप. सोसायटीची सभा खेळीमेळीत

Omkar B

‘त्या’ न्यायाधीशांच्या विरोधात सोमवारी निवेदनांचा वर्षाव

Amit Kulkarni

धर्मनाथ चौकाला जोडणारे रस्ते समस्यांच्या गर्तेत

Patil_p

जेष्ठ वकील एस.बी.शेख यांचा सत्कार

Patil_p