Tarun Bharat

हेवाळे येथील पाणलोट कमात अपहार!

जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार

वार्ताहर / दोडामार्ग:

हेवाळे गावात झालेल्या पाणलोट समितीच्या प्रेरक पोषक कामांत झालेल्या लाखो रुपयांच्या अपहाराची चौकशी होऊन समिती अध्यक्ष सचिन रामराव देसाई यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन बांबर्डे राणेवाडी येथील दौलत दत्ताराम राणे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक तथा पाणलोट विकास समिती सिंधुदुर्ग व्यवस्थापकांना दिले आहे.

या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, ग्रामपंचायत आयनोडे हेवाळेच्या पाणलोट विकास समिती अंतर्गत झालेल्या पाणलोट विकास प्रकल्पाचा पत्ताच नाही आहे. मात्र, याउलट या प्रकल्पाच्या बांधणीसाठी शासनाकडून सुरुवातीला मिळालेल्या प्रेरक उपक्रम विकासकामासाठी गावात दहा लाखांहून अधिक निधी खर्च करण्यात आलेला आहे. घाटीवडे व बांबर्डे खराडी ब्रीज येथे सुमारे पाच लाख रुपये खर्चून दोन बस स्टॉप तर घाटीवडे येथे नाला सरळीकरणसाठी चार लाख, घाटीवडे येथे नळपाणी योजना एक लाख व हेवाळे गावठाण येथे नळयोजना दीड लाख अशी कामे करण्यात आलेली आहेत. या कामांत मोठय़ा प्रमाणात अपहार झालेला असून समितीचे अध्यक्ष सचिन देसाई यांनी संबंधित पाणलोट प्रकल्प गावात राहणाऱया संस्थेची हातमिळवणी करून वरील कामांच्या नावावर लाखोंचा भ्रष्टाचार केला आहे. शिवाय चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पात वरील मलई देणारी कामे वगळता अन्य एका रुपयाचेही पाणलोटचे काम हेवाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात झाले नाही. याला सर्वस्वी जबाबदार समिती अध्यक्ष सचिन देसाई हेच आहेत. त्यामुळे हेवाळे गावात पाणलोट समितीच्या झालेल्या सर्व कामांची खातेनिहाय चौकशी होऊन अध्यक्ष देसाई यांच्यावर कारवाई करावी अन्यथा येत्या 23 सप्टेंबरला उपोषणास बसणार असल्याचा इशाराही यावेळी राणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

Related Stories

जिह्यात रूग्ण संख्येत घट, मृत्यूची चिंता कायम

Patil_p

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते अस्मी मांजरेकर हिचा सन्मान

Anuja Kudatarkar

नीट परीक्षेला जाणे होणार सोपे

NIKHIL_N

धान्य दुकानदारांचे भर पावसात तहसिलदार कार्यालयावर धरणे आंदोलन

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : दापोलीत देखील व्हॉटसअ‍ॅपवर 25 लाखांच्या लॉटरीचे संदेश

Archana Banage

पाचलच्या मुख्याध्यापकांना पोषण आहार भोवला!

Patil_p