Tarun Bharat

हेस्कॉमचे कर्मचारी कमी असल्यामुळे समस्या

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्ती करण्यास विलंब

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनामुळे हेस्कॉमचे 50 टक्के कर्मचारीच कामावर आहेत. कोरोनामुळे काही कर्मचाऱयांना हजर करून घेण्यात आले आहे. या विभागातील अनेक कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विद्युत पुरवठा खंडित झाला तर त्याची दुरुस्ती करण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या वळिवाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्या तसेच झाडे कोसळून विद्युत पुरवठा खंडित होत आहे. इतरही काही कारणांनी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. मात्र, कर्मचारी कमी असल्यामुळे पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास विलंब होत आहे. 50 टक्के कर्मचाऱयांवरच सध्या काम सुरू आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे 50 वर्षांवरील कर्मचाऱयांना घरी राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. मात्र, 50 वर्षांवरील कर्मचाऱयांची संख्या अधिक आहे. इतर कर्मचाऱयांना मात्र कामावर हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. तेच आता हेस्कॉमची जबाबदारी सांभाळत आहेत. काही झाले तरी आम्ही विद्युत पुरवठा सुरळीत करू, त्याचा कामावर कोणताही परिणाम होणार नाही. रात्रंदिवस आमचे लाईनमन काम करत आहेत, असे हेस्कॉमतर्फे सांगण्यात आले. जनतेनेही पुढे सहकार्य करणे गरजेचे आहे. कारण कोरोनासारख्या आजाराला साऱयांनाच लढा द्यावा लागत आहे. तेव्हा प्रत्येकानेच त्याची जाणीव ठेवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

Related Stories

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा

Patil_p

भाऊ धावला बहिणींच्या रक्षणासाठी…

Patil_p

25 एकरातील भातपीक गेले वाहून

Patil_p

लोककल्प फौंडेशनतर्फे मोफत चष्मा वितरण

Amit Kulkarni

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 8 हजार 767 अर्ज दाखल

Patil_p

सिंगल फेज विद्युत पुरवठ्याच्या धरणे आंदोलनाबाबत जनजागृती

Amit Kulkarni