Tarun Bharat

हे त्रिकूट म्हणणार ‘सोपं नसतं काही’

Advertisements

एखादी गोष्ट जेव्हा खूप कष्ट करून मिळवली जाते आणि त्यानंतर मागे वळून पाहताना सोपं नसतं काही हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं. आपल्या आजूबाजूच्या संवादात हे वाक्य आपण कित्येकदा ऐकतो, पण जेव्हा हा अनुभव सेलिब्रिटी कलाकार ऑनक्रिन मांडतात तेव्हा त्याचा एक सिनेमा बनतो. आयुष्यात खरच काहीच सोपं नसतं या उक्तीचा प्रत्यय मनोरंजनक्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपणाऱया कलाकारांना प्रकर्षाने येतो. त्यात गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे सिनेमे, मालिका, नाटक ही तिन्ही माध्यमं लॉक झाली ते पाहता कलाकारांनी यातून बराच धडा गिरवला आहे. आता सेलिब्रिटी कलाकारांमधील एक त्रिकूट लवकरच पडद्यावर भेटायला येणार आहे. अभिनेता शशांक केतकर, अभिजित खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे ही त्रिफळी नेमकं काय सोपं नसतं हे एका वेबसिरीजमधून सांगणार आहे.  डिजिटल युगात मनोरंजनक्षेत्र प्रेक्षकांच्या मुठीत आलं आहे ते स्मार्टफोनमुळे. त्यामुळे मोठय़ा पडद्यापेक्षा सध्याचे सेलिब्रिटी कलाकार वेबसिरीजमध्ये काम करण्याची संधी सोडत नाहीत.

काही दिवसांपासून सोशलमीडियावर एक पोस्ट व्हायरल होतेय. त्यामध्ये असं म्हटलंय की, शशांक केतकर >पाहिले न मी तुला’ या मालिकेतून ब्रेक घेणार. मालिकेचा खलनायक असला तरी प्रमुख व्यक्तीरेखा असलेल्या शशांकच्या ब्रेकची चर्चा तर होणारच ना. तर शशांकला ब्रेक हवा आहे तो >सोपं नसतं काही’ याच वेबसिरीजच्या शूटिंगसाठी. लवकरच या वेबसिरीजचे शूटिंग सुरू होणार असल्याने शशांकने त्याच्या सध्या गाजत असलेल्या >पाहिले न मी तुला’ या मालिकेचे एपिसोड आधीच शूट केले आहेत. शशांकने यापूर्वी तीन मालिका केल्या असून दोन सिनेमातही काम केले आहे. शिवाय प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांच्या निमित्ताने त्याने रंगभूमीही गाजवली आहे. वेबसिरीजमध्ये आता तो लवकरच दिसणार आहे.

तब्बल चार वर्षे कधी ट्रोलिंग, कधी मीम्स तर कधी अव्वल टीआरपीमुळे चर्चेत राहिलेल्या माझ्या नव्रयाची बायको ही मालिका संपली असली तरी या मालिकेतील खलनायक रंगवलेला गुरूनाथफेम अभिजित खांडकेकर हा देखील >सोपं नसतं काही’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. माझ्या नव्रयाची बायको या मालिकेने लोकप्रिय खलनायक म्हणून घराघरात पोहोचलेला अभिजित खांडकेकर चाहूल गुन्हेगाराची या शोचा सूत्रधारही बनला आहे. मुळात रेडिओजॉकी म्हणून काम करत अभिनयाच्या प्रांतात आलेल्या अभिजितकडे निवेदनाचीही उत्तम शैली आहे. अभिजितच्या चाहत्यांनाही त्याला नव्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

कुंकू या मालिकेतून एका राजकीय नेत्याचे व्यक्तीगत आयुष्य उलगडून दाखवणाया मालिकेतून अभिनयक्षेत्रात आलेल्या मृण्मयी देशपांडे हिने गेल्या एक तपात वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. अभिनयच नव्हे तर तिने दिग्दर्शनातही पाऊल टाकत मन फकीरा या सारखा वेगळा विषय मांडला. सध्या ती मालिकांपासून लांब असली तरी मध्यंतरी मृण्मयीने केलेल्या सिनेमांच्या निवडीवरून तिच्यातील चोखदळ अभिनेत्री प्रेक्षकांना आवडली आहे. कटय़ार काळजात घुसली या सिनेमातील तिचा अभिनय असो किंवा मिस यू मिस्टर या सिनेमातील तिने वठवलेली आजच्या काळातील बायको केवळ अप्रतिम. मृण्मयी उत्तम डान्सरही आहे. सध्या ती सारेगमप या शो ची निवेदिका म्हणून काम करतेय. काहीतरी नवीन करण्यासाठी नेहमीच आतूर असलेल्या मृण्मयीलाही या वेबसिरीजमध्ये पाहणे ही तिच्या चाहत्यांसाठी ट्रीट असणार आहे.

शशांक, अभिजित आणि मृण्मयी या आजच्या स्टार कलाकारांनी वेबसिरीजच्या माध्यमातून एकत्र येत सोपं नसतं काही हे सांगायचे ठरवले आहे खरे, पण नेमकं काय सोपं नसतं हे त्यांच्याकडून ऐकण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागेल. 

Related Stories

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर झळकणार वेल डन बेबी

Patil_p

‘बुल’मध्ये पॅराट्रूपर साकारणार शाहिद

Patil_p

बेळगाव शहरात दसऱ्यानिमित्त म्हैस शर्यतीची अनोखी परंपरा

mithun mane

500 कोटींच्या चित्रपटात दिसणार ऐश्वर्या

Amit Kulkarni

अभिनेता प्रवीण तरडे यांनी राजकीय पक्षाची भूमिका घेण्याबाबत ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

Kalyani Amanagi

‘छतरीवाली’मध्ये दिसणार रकुल प्रीत

Patil_p
error: Content is protected !!