ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातला असतानाच काही देश कोरोना रुग्णांची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतासह आठ देश हे सडलेले सफरचंद आहेत, असे अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील शास्त्रज्ञ स्टीव हँक यांनी म्हटले आहे.


व्हेनेझुएला, इजिप्त, सीरिया, येमेन, तुर्की, व्हिएतनाम, चीन आणि भारत या देशांवर स्टीव हँक यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यांनी भारत कोरोनाविरोधात करत असलेल्या उपाययोजनांवरही त्यांनी टीका केली आहे. त्यांनी विद्यापीठाच्या आकडेवारीचा ग्राफ शेअर करत भारतासह आठ देशांना सडलेले सफरचंद असे म्हटले आहे.