Tarun Bharat

‘हे’ प्राध्यापक करणार अयोध्येतील मशिदीचे डिझाईन

ऑनलाईन टीम / अयोध्या : 

अयोध्येतील धनीपूर गावात पाच एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या मशिद आणि कॉम्प्लेक्सचे डिझाईन जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख एम. एस.अख्तर तयार करणार आहेत. मशिद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाकडून तयार करण्यात आलेल्या इंन्डो इस्लामिक कल्चर ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी अख्तर यांची यासाठी निवड केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने मशिद आणि कॉम्प्लेक्ससाठी धनीपूर येथे 5 एकर जागा देण्याचे सरकारला आदेश दिले होते. त्यानुसार सरकारने मशिदीसाठी पाच एकर जागा दिली आहे. या मशिदीच्या उभारणीसाठी इंन्डो इस्लामिक कल्चर ट्रस्टची स्थापनाही करण्यात आली. तसेच मशिद आणि कॉम्प्लेक्सच्या डिझाईनचे काम अख्तर यांच्याकडे देण्यात आले आहे. 

अख्तर संपूर्ण पाच एकर परिसराचे डिझाईन करणार आहेत. त्यामध्ये मशिद, कॉम्प्लेक्स आणि एक रुग्णालय देखील असणार आहे. कॉम्प्लेक्समध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी असतील, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

Related Stories

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल यांची आज पुन्हा होणार कोरोना टेस्ट

Tousif Mujawar

राम मंदिरासाठी बाळासाहेबांना ‘भारतरत्न’ द्या

Patil_p

भारतातील कोरोना रूग्णसंख्या 55 लाखांवर

datta jadhav

केंद्र सरकारकडे 20 हजार कोटीची मागणी

Patil_p

फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत पंतप्रधानांची चर्चा

Patil_p

हज यात्रेसाठी अर्ज केलेल्यांना मिळणार पूर्ण पैसे परत

datta jadhav