Tarun Bharat

‘हे’ राज्य घालणार ऑनलाईन गेम्सवर बंदी

ऑनलाईन टीम / बेंगळूर : 

मुलांच्या ऑनलाईन गेम्स खेळण्याने पालकांच्या कष्टाच्या पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे कर्नाटकात लवकरच ऑनलाईन गेम्सवर बंदी घातली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. 

माध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले, ऑनलाईन गेम्समुळे लहान मुले, विद्यार्थी दिवसभर गेम खेळण्यात व्यस्त असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोच, याशिवाय आई-वडिलांनी कष्टाने कमावलेल्या पैशाचा अपव्यय होतो. हा अपव्यय टाळण्यासाठी कर्नाटक सरकार ऑनलाईन गेम्सवर बंदी आणण्याचा विचार करत आहे. 

सरकार लवकरच यासंदर्भात संबंधित विभागाकडून सूचना मागवणार आहे. गेम्स बंदीला विरोधीपक्षांचाही पाठिंबा मिळत असल्याचे बोम्मई यांनी सांगितले.

Related Stories

पश्चिम बंगालमध्ये 5 व्या टप्प्यातील प्रचार समाप्त

Patil_p

राज्यसेवा पुर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू : जिल्हादंडाधिकारी

Abhijeet Khandekar

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा

Patil_p

3 ते 4 टप्प्यांमध्ये बिहारची निवडणूक शक्य

Patil_p

इचलकरंजीतील ‘त्या’ कोरोना बाधित बालकाची प्रकृती स्थिर

Archana Banage

हार्दिक पटेलचा काँग्रेसला रामराम

datta jadhav