Tarun Bharat

हैतीमध्ये 17 अमेरिकन मिशनरींचे अपहरण

मुलांसमवेत कुटुंबीयांना केले लक्ष्य

वृत्तसंस्था/ पोर्ट-ऑ-प्रिन्स

हैती या देशामध्ये एका टोळीने 17 अमेरिकन ख्रिश्चन मिशनरींचे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत अपहरण केले आहे. सर्व मिशनरी राजधानी पोर्ट-ऑ-प्रिन्सच्या एका अनाथलयाबाहेर असताना ही घटना घडली आहे. लोक स्वतःच्या समुहातली काही सदस्यांना विमानतळावर सोडण्यासाठी बसने जात होते. अपहृतांमध्ये मिशनरींची मुलेही सामील आहेत.

याप्रकरणी आम्ही नजर ठेवून आहोत असे अमेरिकेच्या विदेश विभागाच्या प्रवक्त्या जेनिफर वियाउ यांनी म्हटले आहे. तर हैतीमधील अमेरिकेच्या दूतावासाकडून कुठलेच विधान करण्यात आलेले नाही. याप्रकरणी अधिक माहिती जमवत आहोत. अपहृत मिशनरी आणि त्यांच्या चर्चसंबंधी माहिती प्राप्त केली जात असल्याचे हैतीच्या पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.

बंदुकधाऱयांची ही टोळी अनेक महिन्यांपासून पोर्ट-ऑ-प्रिन्स आणि डॉमिनिकन प्रजासत्ताकसोबत लागून असलेल्या सीमेवर सक्रीय आहे. ही टोळी चोरी आणि अपहरणाच्या अनेक घटनांमध्ये सामील राहिली आहे.

हैतीची गणना आफ्रिकेतील सर्वात गरीब देशांमध्ये होते. अलिकडच्या काळात तेथील गँगवॉरच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे हजारो लोकांना बेघर व्हावे लागले आहे. देशाची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आहे. जुलै महिन्यात हैतीचे अध्यक्ष जोवेनेल मोइस यांची हत्या करण्यात आली. तर ऑगस्टमध्ये भूकंपात 2 हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. कॅरेबियन देश हैतीमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी होती. भूकंपाच्या धक्क्यामुळे 2 शहरांमध्ये  प्रचंड नुकसान झाले होते.

Related Stories

अमेरिकेच्या राजवटीतील‘कमला’ अध्याय

Patil_p

लस न घेतलेल्या लोकांसाठी ‘लॉकडाउन’

Patil_p

फरार मेहुल चोक्सीला अपहरणाची भीती

Patil_p

इस्त्राइल- पॅलेस्टाइन यांच्यात पुन्हा संघर्ष भडकण्याची चिन्हे

Patil_p

कोलंबियात बाधितांनी ओलांडला 20 लाखांचा आकडा

datta jadhav

हुकूमशाह जनतेसमोर रडले

datta jadhav