Tarun Bharat

हैदराबादच्या पट्टेरी वाघाचा कोल्हापुरात 6 तास मुक्काम

वन विभागाच्या विश्रामगृह परिसरात बंदोबस्त, हैदराबाद वन विभागातील पशुवैद्यकीय पथक,

दोन ट्रक, वन विभागाच्या तीन जीपचा ताफा

प्रतिनिधी / कोल्हापूर

हैदराबादमधील पट्टेरी वाघ…राजस्थानच्या वाटेवर आहे…त्याने बुधवारी पहाटे कोल्हापुरातील वन विभागात मुक्काम केला. सहा तासांचा हॉल्ट घेऊन दुपारी तो पुढच्या प्रवासाला निघाला. त्याच्या मुक्कामाच्या काळात विश्रामगृह परिसरात बंदोबस्त होता. त्याच्या तैनातीला 2 ट्रक, तीन जीप, पशुवैद्यकीय अधिकाऱयांचे विशेष पथक आणि गस्ती पथक होते. कोल्हापूरचा पाहुणचार घेत त्याने डरकाळी फोडत कोल्हापूरकरांचा निरोप घेतला.

तमीळनाडूतील हैदराबाद येथील प्राणी संग्रहालयातील बंगाली पट्टेरी वाघ वन विभागाकडे उपचारासाठी आला. केंद्रीय वन विभागाने त्याला राजस्थानमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ट्रकला बनवलेल्या विशेष वाहनातून तो राजस्थानला निघाला आहे. जोधपूर जिल्हÎातील उदयपूर क्षेत्रातील सज्जनगड बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये तो पोहोचणार आहे. त्याच्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱयांचे विशेष पथक, वन विभागाचे विशेष गस्तीपथक आणि वन विभागाच्या कॅनवॉय अशा वाहनांचा ताफा आहे.

एखादा वन्य प्राणी एका अभयारण्य, नॅशनल पार्कमधून अन्य अभयारण्यात नेताना वन विभाग दक्षता घेतो. हैदराबादहून वन विभागाच्या विशेष सुरक्षेत पट्टेरी वाघ कोल्हापुरात बुधवारी पहाटे दाखल झाला. ताराबाई पार्क येथील वन विभागाच्या विश्रामगृह परिसरात त्याने मुक्काम केला. त्याच्यासोबत आलेला सुरक्षा स्टाफही येथे थांबला. दुपारी 1 वाजता पट्टेरी वाघाची झोप पुर्ण झाली. कोल्हापुरकरांचा हा पाहुणचार घेतल्यानंतर त्याने डरकाळी फोडली, अन् बऱयाच वर्षानंतर कोल्हापूरकरांच्या छातीत धस्स झाले. कोल्हापूरकर त्याला पाहण्यासाठी ताराबाई पार्कात गर्दी करेपर्यत त्याने राजस्थानची वाट धरली..

चेन्नईचा वाघ, बोरीवलीच्या वाघीणीचाही कोल्हापुरात मुक्काम

हैदराबाद नॅशनल पार्कमधून पट्टेरी वाघ राजस्थानातील नॅशनल पार्कमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती वन्यजीव विभागाकडून देण्यात आली. यापुर्वी चेन्नई येथील नॅशनल पार्कमधील वाघ पुढे जाण्यापुर्वी असाच कोल्हापूर मुक्कामी थांबला होता. बोरीवली मुंबई येथील नॅशनल पार्कमधील वाघीण त्यानंतर कोल्हापुरात दाखल झाली होती. या दोन्ही वाघांचा त्यांच्या अधिवास क्षेत्रात बदल झाल्याने कोल्हापुरात मुक्काम झाल्याची माहिती वन्यजीव विभागातून देण्यात आली.

Related Stories

‘करुणा आणि धनंजय मुंडे यांची प्रेम कहानी मराठीत येणार’

Archana Banage

शिराळ्यात वाहतूक नियंत्रणावर नियोजन बैठक

Archana Banage

शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुऱ्या सुविधा पूर्ण कराव्यात

Archana Banage

धामणी प्रकल्पाचे काम सुरु न झाल्यास १०० जणांचे आमरण उपोषण

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : ४० वर्षाच्या आरोग्य सेवेचा खरा आरोग्यदूत हरपला

Archana Banage

दगडफेक काय करताय?, हिंमत असेल तर समोर या – चित्रा वाघ

Archana Banage