Tarun Bharat

हैदराबादमध्ये DRDO ने सुरू केली मोबाईल टेस्टिंग लॅब

ऑनलाईन टीम / हैदराबाद : 

 हैदराबादमध्ये DRDO संशोधन संस्थेने दोन कंटेनरमध्ये मोबाईल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी (एमव्हीआरडीएल) नावाची मोबाईल प्रयोगशाळा सुरू केली आहे. कोरोना व्हायरस स्क्रीनिंग आणि त्यासंदर्भात संशोधन, विकास हा या मोबाईल प्रयोगशाळेचा उद्देश आहे.

हैदराबादच्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये या लॅब तयार करण्यात आल्या असून, या लॅबमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळेच्या सर्व सुविधा असल्याचा दावा डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,  कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक चाचणी या लॅबमध्ये करता येते. ही लॅब 100 टक्के सुरक्षित असून, गरजेनुसार ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली जाऊ शकते.  

अशा प्रकारची लॅब तयार करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, डीआरडीओने केवळ 15 दिवसात ही लॅब विकसित केली आहे. या लॅबमध्ये दिवसाला 1000 टेस्ट केल्याचा दावा डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

Related Stories

काँग्रेस आक्रमक! महागाई, बेरोजगारीविरोधात आज देशव्यापी आंदोलन

Archana Banage

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच होणार!

datta jadhav

गर्भपातासाठी 24 आठवडय़ापर्यंत मुदतवाढ

Patil_p

शेतकरी, अग्निवीर आंदोलनात माओवाद्यांची ‘घुसखोरी’

Patil_p

काँगेसमध्ये मतभेदांना आणखी ऊत

Patil_p

डीएसपी सोनींचा जामीन अर्ज फेटाळला

Patil_p