Tarun Bharat

हैदराबाद-दिल्ली कॅपिटल्स संघात आज लढत

इंडियन प्रीमियर लीग – श्रेयस अय्यर परतल्याने दिल्ली आणखी मजबूत, धवन-शॉच्या कामगिरीकडेही लक्ष

दुबई / वृत्तसंस्था

शेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे नवसंजीवनी लाभलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज (बुधवार दि. 22) झगडणाऱया सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात वर्चस्व गाजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. दिल्लीचा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱया स्थानी आहे तर पहिल्या टप्प्यात अतिशय खराब फॉर्ममध्ये राहिलेल्या सनरायजर्सचा संघ शेवटच्या स्थानी आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता ही लढत खेळवली जाईल.

दिल्लीने या हंगामात उत्तम वर्चस्व गाजवताना 8 सामन्यातून 12 गुण वसूल केले. दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबादला मात्र 7 सामन्यात थोडेथोडके नव्हे तर 6 पराभव पत्करावे लागले.

रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने आयपीएल पहिल्या टप्यातील शेवटच्या साखळी सामन्यात विजय संपादन केला होता आणि येथेही विजयानेच प्रारंभ करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. दिल्ली संघात अनेक पॉवरहिटर्स असून अगदी दर्जेदार गोलंदाजीविरुद्धही ते तुटून पडू शकतात आणि यामुळे सनरायजर्सचे गोलंदाज याला अपवाद ठरण्याचे काही कारण नाही.

सलामीवीर शिखर धवन (380 धावा) निवडकर्त्यांनी टी-20 वर्ल्डकपमधून वगळले, तो निर्णय चुकीचा असल्याचे दाखवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल तर त्याचा युवा सहकारी पृथ्वी शॉ (308 धावा) धावांची आतषबाजी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. दिल्लीची मध्यफळी श्रेयस अय्यर, रिषभ पंत (213 धावा), ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ (104 धावा), मार्कस स्टोईनिस (71 धावा), शिमरॉन हेतमेयर (84 धावा) यांच्यामुळे मजबूत आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजयाच्या ट्रकवर राहण्यासाठी प्रयत्नशील असताना सलामीवीर अपयशी ठरले तर मध्यफळीला जबाबदारी घ्यावी लागेल. मार्चमध्ये खांद्याची दुखापत झालेला अय्यर आता तंदुरुस्त होऊन परतला असून आपला फॉर्म अधोरेखित करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

संभाव्य संघ

दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, शिखर धवन, शिमरॉन हेतमेयर, श्रेयस अय्यर, स्टीव्ह स्मिथ, अमित मिश्रा, ऍनरिच नोर्त्जे, अवेश खान, बेन डॉर्शिस, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, कुलवंत खेजरोलिया, लुकमन मेरिवाला, प्रवीण दुबे, टॉम करण, उमेश यादव, अक्षर पटेल, ललित यादव, मार्कस स्टोईनिस, रविचंद्रन अश्विन, सॅम बिलिंग्ज, विष्णू विनोद.

सनरायजर्स हैदराबाद ः केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, शेरफेन रुदरफोर्ड, वृद्धिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, रशिद खान, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी. नटराजन, बसिल थम्पी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, अब्दुल समद, जे. सुचित, जेसॉन होल्डर, विराट सिंग, प्रियम गर्ग, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान, जेसॉन रॉय.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.

विजयी सुरुवात केली तरच सनरायजर्सचे मनोबल उंचावणार

सनरायजर्स संघाची पहिल्या टप्प्यात खराब कामगिरी झाली असल्याने यावर मार्ग काढण्यासाठी आजचा पहिला सामना त्याच्यासाठी विशेष महत्त्वाचा असेल. येथे विजयी सुरुवात केल्यास त्यांचे मनोबल उंचावू शकेल. मात्र, या उर्वरित टप्प्यातही त्यांच्यासमोर अनेक अडचणी असणार आहेत आणि हंगामात सर्वाधिक धावा जमवणारा जॉनी बेअस्टोने माघार घेतली असल्याने त्याची खरी सुरुवात झाली आहे. बेअरस्टो नसल्याने डेव्हिड वॉर्नरवर (193 धावा) मुख्य भिस्त असणार आहे. केन विल्यम्सन, मनीष पांडे, वृद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर यांनाही समयोचित योगदान द्यावे लागेल. स्पिन सेन्सेशन रशिद खानच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांना देखील नियंत्रित मारा करणे भाग असणार आहे.

Related Stories

विंडीजचे माजी क्रिकेटपटू मोसली यांचे अपघाती निधन

Patil_p

जागतिक चॅम्पियनशिपचे यजमानपद भारताने गमावले

Patil_p

आयर्लंड-नामिबिया आज महत्त्वाची लढत

Amit Kulkarni

विंडीज संघात गॅब्रियलचा समावेश

Patil_p

भारतीय क्रिकेट संघ लंडनकडे रवाना

Patil_p

सिंधू, दीपिका कुमारी, पूजा राणीचे धडाकेबाज विजय

Patil_p