Tarun Bharat

हैदराबाद-दुबई विमानतळादरम्यान करार

Advertisements

लसीच्या सुलभ वाहतुकीसाठी पाऊल

अन्य देशांना कोरोनावरील लस निर्यात करण्यास हैदराबाद विमानतळ सज्ज आहे. हैदराबाद विमानतळाने व्हॅक्सिन प्रेट कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी दुबई विमानतळासोबत करार केला आहे.

एअर प्रेट कॉरिडॉर

जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, जीएमआर हैदराबाद एअर कार्गो आणि दुबई एअरपोर्ट्सने संयुक्तपणे एक व्हॅक्सिन एअर प्रेट कॉरिडॉर निर्माण करणार असल्याची घोषणा सोमवारी केली आहे. याला हैदराबाद टू दुबई ग्लोबल व्हॅक्सिन कॉरिडॉर असे म्हटले जाणार आहे.

व्हॅक्सिन-अँटीडोट्सचे निर्मितीकेंद्र

हैदराबाद कोविड-19 ची लस तसेच अन्य अँटीडोससाठी मुख्य केंद्र ठरत आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दुबई विमानतळादरम्यान असलेल्या कॉरिडॉरमध्ये लस वाहतुकीसाठी सेंसेटिव्ह तापमान प्राथमिकतेनुसार असणार आहे. या कराराच्या अंतर्गत कोविड-19 लस प्रत्येक निर्माता तसेच लोकांपर्यंत सुव्यवस्थित पद्धतीने पोहोचविली जाणार असल्याचे पत्रकात नमूद आहे.

लस साठवणूक अन् प्रक्रिया विभाग

जीएमआर हैदराबाद एअर कार्गोमध्येही तापमान नियंत्रित करणारा आधुनिक फार्मा आणि लस साठवणूक तसेच प्रक्रिया विभाग आहे. जीएमआर हैदराबाद एअर कार्गो भारताचा पहिला जीडीपी प्रमाणित तापमान नियंत्रित फार्मा विभाग असल्याचा दावा करतो. टर्मिनलवर अनेक टेम्प्रजोन असून यात उणे 20 अंशापासून उणे 25 अंश तापमान ठेवता येणारे कंटेनर असल्याची माहिती प्रवक्त्याने दिली आहे.

Related Stories

ऑपरेशन द लंडन ब्रिज लीक

Patil_p

जगभरातील बाधितांचा आकडा 9 कोटींसमीप

datta jadhav

रेमडेसिविर मंजूर, जीव वाचविण्यास अपयशी

Patil_p

सरकारविरोधी रॅली; मरियम नवाज यांच्याविरोधात गुन्हा

datta jadhav

5 लाख लोकांना इस्रायलने दिला कोरोना प्रतिबंधक चौथा डोस

Patil_p

न्यूयॉर्कमध्ये ‘रँकिंग’ प्रणालीने होणार महापौराची निवड

Amit Kulkarni
error: Content is protected !!