Tarun Bharat

हैदराबाद मनपा त्रिशंकू;एमआयएम किंगमेकर

Advertisements

हैदराबाद / वृत्तसंस्था

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. भाजपची 4 जागांवरून 49 जागांपर्यंत मजल पाहोचली आहे. भाजपने या निवडणुकीत 149 वॉर्डमध्ये उमेदवार उतरवले होते. भाजपच्या यशामुळे सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसला मोठा फटका बसला आहे. मागील वेळी 99 जागा मिळवून सत्ता स्थापन करणाऱया टीआरएसच्या पदरात केवळ 55 जागा पडल्या आहेत. तर, ओवैसी यांच्या एमआयएमने 44 जागांवर विजय मिळवला आहे. एमआयएम तिसऱया क्रमांकावर फेकला गेला असला तरी आता तोच पक्ष ‘किंगमेकर’ ठरण्याची चिन्हे आहेत.

हैदराबाद महापालिका निवडणुकीत एकूण 150 जागांपैकी तेलंगणा राष्ट्र समितीला 55 जागांवर विजय मिळाला. सत्ताधारी टीआरएस हैदराबादमध्ये सर्वात मोठा पक्ष असला तरी त्यांना दुसऱया पक्षावर सत्तेसाठी अवलंबून राहावे लागेल. या निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने हैदराबादमध्ये महापौर कोणत्या पक्षाचा होणार याकडे लक्ष लागले आहे.

भाजपने या निवडणुकीत जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तसेच दुसरीकडे, हैदराबादचे नाव ’भाग्यनगर’ करण्याची घोषणा केली होती. त्याचा त्यांना फायदा झाल्याचे दिसून येत आहे. तेलंगणा राष्ट्र समितीला 33 जागा गमवाव्या लागल्या. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला 2016 च्या निवडणुकीच्या तुलनेत 40 टक्के कमी जागा मिळाल्या.

Related Stories

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना मोठा झटका; सुनावली पाच वर्षांची शिक्षा

Sumit Tambekar

आसाममध्ये अतिवृष्टीनंतर हवाई दलाकडून मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम

Abhijeet Shinde

डिफेन्स एक्स्पोमध्ये 71 सामंजस्य करार

Patil_p

सुरतमध्ये म्यूकोरमाइकोसिसमुळे 8 रुग्णांनी गमावली दृष्टी

datta jadhav

व्यापार करारातून ट्रम्प यांची माघार

tarunbharat

आरबीआयचं डिजिटल चलन येणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!