Tarun Bharat

हॉकी स्पर्धा लांबणीवर

कोव्हिडच्या वाढत्या रुग्णांमुळे हॉकी इंडियाने घेतला निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कनिष्ठ महिलांची 11 वी राष्ट्रीय हॉकी स्पर्धा कोरोनाच्या कारणास्तव लांबणीवर टाकली असल्याचे हॉकी इंडियाने बुधवारी जाहीर केले. 3 ते 12 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा झारखंडमधील सिमडेगा येथे होणार होती.

सिमडेगाचे जिल्हाधिकारी व राज्याच्या संबंधित अधिकाऱयांनी घालून दिलेली नियमावली आणि सूचनांनुसार हॉकी इंडियाने ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कोव्हिड 19 चे रुग्ण वाढत असल्याने आणि स्थानिक प्रशासकांच्या सल्ल्यानंतर हॉकी इंडियाने हॉकी झारखंडशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे,’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोम्बम यांनी सांगितले. ‘या संघटनेने अलीकडेच 11 व्या उपकनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते आणि त्याला राज्य सरकारकडून उत्तम पाठिंबा मिळाला होता. पण सध्या कोव्हिडचे रुग्ण वाढत असल्याने तसेच राज्य सरकारच्या नियमावलीनुसार खेळाडूंचे हित लक्षात घेऊन ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेसाठी देशातील 26 संघांनी प्रवेशअर्ज दाखल केला होता. यजमान संघाने ही स्पर्धा सलग दोनदा जिंकली असून ते हॅट्ट्रिकसाठी प्रयत्नशील होते.

Related Stories

पहिल्या सामन्यात ‘पावसा’चा विजय

Patil_p

विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या वेळापत्रकात फेरबदल

Patil_p

भारताविरुद्ध मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा

Patil_p

शेवटच्या सामन्यात द.आफ्रिका युवा संघ विजयी

Patil_p

पाकच्या पहिल्या डावात तिघांची शतके

Patil_p

इटलीची पाओलिनी विजेती

Patil_p