Tarun Bharat

हॉटेल सूरू पण राजवाडा चौपाटी बंदच

Advertisements

500 व्यावसायिकांना बसतोय फटका

प्रतिनिधी/ सातारा

अनलॉकचे टप्पे पूर्ण झाले असले तरी सात महिन्यांपासून बंद असलेली राजवाडा चौपाटी अद्याप सूरू नाही. यामुळे 500 व्यवसायिकांना यांचा फटका बसत आहे. हॉटेल सूरू झाल्यानंतर आता चौपाटी सूरू करण्याची मागणी वाढली आहे.

        सातारा शहराचा मनबिंदू असणाऱया राजवाडय़ासमोरील मोकळ्या पटांगणात (गांधी मैदान) येथे गेली अनेक वर्षे दररोज चौपाटी भरते. जिभेचे चोचले पुरविणारे खाद्य पदार्थ या ठिकाणी मिळत असल्याने खवय्यांची गर्दी असते. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱया किंमतीत सर्व पदार्थ मिळत असतात. चायनीज, तंदुर, शोरमा, हॉट बर्गर, थालीपीठ, मिल्कशेक, भेळ, पावभाजी, साऊथ इंडियन फुट खाण्यासाठी शहरसह आसपासच्या ग्रामीण भागातील लोक गर्दी करत होते. 100 हून अधिक गाडे खवय्यांना खाद्यसेवा पुरवतात. हे गाडामालक, त्यांचे कुटुंब आणि त्यावरील कामगार असे सुमारे 500 जणांचा उदरनिर्वाह या चौपाटीवर अवलंबून आहे.

देशव्यापी लॉकडाऊन होण्यापूर्वी परिसर देखभालीच्या नावाखाली 15 दिवस चौपाटी बंद करण्यात आली. कामे संपली आणि मार्चच्या अखेरीस चौपाटी पुन्हा बंद झाली. आज, उद्या सुरू होईल. या आशेवर या ठिकाणचे व्यावसायिक हातावर हात ठेवून बसले होते. तीन महिन्यांच्या सार्वत्रिक लॉकडाऊनचा कलावधी संपला आणि टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. इतर व्यवसाय सुरू झाले तरी साताऱयाची चौपाटी अजूनही लॉकच आहे. या ठिकाणच्या व्यावसायिक, कामागारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Stories

सदरबाजारातील तो आजार डेंगू, चिकणगुनियाच?

Patil_p

सातारा : वाईमध्ये चोरट्यांची दिवाळी

Archana Banage

अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार

datta jadhav

सातारा : चोवीस तासात 34 बाधितांचा मृत्यू

datta jadhav

कास, ठोसेघरची गर्दी रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान

Patil_p

सुखवार्ता : पॉझिटिव्ह रेट एकच्याही खाली

datta jadhav
error: Content is protected !!