Tarun Bharat

हॉलंडचा आयर्लंडवर रोमांचक विजय

Advertisements

युट्रेच : तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान हॉलंडने विजयी सलामी देताना बुधवारी झालेल्या पहिल्या रोमांचक सामन्यात आयर्लंडचा केवळ एका धावेने पराभव केला. या सामन्यात हॉलंडच्या टिम व्हान डर गुगटेनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. 2023 साली भारतात होणाऱया आयसीसीच्या विश्व करंडक क्रिकेट स्पर्धा अंतर्गत ही पात्रतेची स्पर्धा घेतली जात आहे. आयर्लंडचा संघ या पात्र फेरीच्या स्पर्धेसाठी हॉलंडमध्ये दाखल झाला. मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हॉलंडचा डाव 50 षटकांत 195 धावांत आटोपला. त्यानंतर आयर्लंडने 50 षटकांत 9 बाद 194 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना केवळ एका धावेने गमवावा लागला. हॉलंडतर्फे गुगटेनने 53 चेंडूत 4 षटकार आणि एक चौकारांसह 49 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक ः हॉलंड 50 षटकांत सर्वबाद 195 (व्हान डर गुगटेन 49, व्हॅन बेक 29, झुल्फिकार 23, मॅक्स ओ दाऊद 23, डिलेडी 21, मेबर्ग 20, यंग 3-34, लिटल 3-32), आयर्लंड 50 षटकांत 9 बाद 194 (स्टर्लिंग 69, सिमी सिंग 45, मॅकब्राईन 17, सिलार 3-27, व्हॅन बेक 2-44, क्लासेन 1-28, व्हान डर गुगटेन 1-25, ग्लोव्हर 1-46).

Related Stories

बहरातील लाबुशानेचे चौथे शतक

Patil_p

कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रिया मलिकला सुवर्ण

Patil_p

अभिमन्यु ईश्वरनची अडीच लाखांची मदत

Patil_p

चेन्नईचा प्रणव भारताचा 75 वा ग्रँडमास्टर

Patil_p

भारतीय महिलांना सांघिक नेमबाजीत सुवर्ण

Amit Kulkarni

क्रीडामंत्र्यांनी घेतली यू-20 ऍथलेट्सची भेट

Patil_p
error: Content is protected !!