Tarun Bharat

होंडाची ‘ऍक्टीव्हा 6 जी’ लवकरच बाजारात

Advertisements

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी ‘होंडा’ आपली सर्वाधिक खपाची स्कूटर ‘ऍक्टीव्हा 5जी’ नव्या रुपात दाखल करणार आहे.

होंडाने सध्या बाजारात असलेल्या ‘ऍक्टीव्हा 5 जी’ या बीएस 6 मॉडेलला आणखी स्मार्ट बनवत ‘ऍक्टीव्हा 6 जी’ सादर केली आहे. येत्या 15 जानेवारीला ही स्कूटर लाँच होणार आहे.

ऍक्टीव्हा 6 जी मध्ये बीएस 6 आणि 110 सीसी इंजिन असणार आहे. पॉवर आणि टॉर्क पहिल्यापेक्षा जास्त मिळणार आहे. नवीन इंजिनची क्षमता 7.96 पीएस पॉवर आणि 9 एनएम टॉर्क जनरेट करण्याची आहे. स्कुटीच्या एंट्री लेव्हल व्हेरिएंटमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम असेल. याशिवाय आरामदायी रायडिंगसाठी टेलिस्कोपिक फॉर्क सस्पेन्शनही मिळणार आहे.

या स्कूटरमध्ये कनेक्टिव्हीटीवर भर देण्यात आला आहे. कारप्रमाणेच अद्ययावत डिजीटल इंन्स्टूमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी आणि कॉल अलर्ट सिस्टम यांसारखे फीचर्स या नव्या ऍक्टीव्हामध्ये पहायला मिळणार आहेत. या स्कूटरची एक्स शोरुम किंमत अंदाजे साठ हजारांपासून पुढे असणार आहे.

Related Stories

ट्रीम्पची नवी टायगर 850 स्पोर्टस सादर

Patil_p

मारुती सुझुकीची इको आता नव्या रुपात

Amit Kulkarni

टेस्लासमोर कार सादर करण्याच्या अडचणी

Patil_p

मारुतीची नवी आल्टो के 10 लाँच

Amit Kulkarni

भारताची इलेक्ट्रीक मोटरसायकल ऑक्टोबरमध्ये बाजारात

Patil_p

‘ईव्ही एक्स्पो-2022’ चे ऑगस्टमध्ये आयोजन

Amit Kulkarni
error: Content is protected !!