Tarun Bharat

होंडाची नवी अमेझ बाजारात

किंमत 6.32 लाख रुपये – ऑनलाईन बुकिंग सुविधा

नवी दिल्ली

होंडा कंपनीने आपल्या सर्वात प्रसिद्ध असणारी सुधारीत अमेझ 2021 ही नवी कार बाजारात सादर केली आहे. या कारची सुरुवातीची एक्सशोरुम किमत 6.32 लाख रुपये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. टॉपच्या मॉडेलसाठी 11.15 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. सदर गाडीला सेडान ई, एस आणि व्हीएक्स मॉडेलमध्ये सादरीकरण करण्यात आलेले आहे. अपडेट मॉडेलमध्ये कंपनीने विविध फिचर्सची जोडणी केली असून इंजिनमध्ये कोणताही बदल केला नसल्याची माहिती आहे. होंडा अमेझ फेसलिफ्ट 2021 ची भारतीय बाजारात किया सेडानसोबत टक्कर राहणार आहे.

सदरची गाडी बुक करायची झाल्यास ऑनलाईन किंवा विक्रेते यांच्याकडे बुक करता येते.

विविध फिचर्स….

­ कारचे डॅशबोर्ड आणि स्टेअरिंगवर सिल्वर टोन फिनिशिंग

­ फॅब्रिकसोबत 7 इंच टचस्क्रीन अँड्राईड ऑटो व ऍपल कारप्ले

­ पॉवर विंडो, ऍन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम

­ एअरबॅग्स, सीट बेल्ट अलर्ट, पार्किंग सेंसर

इंजिन ः कंपनीने कारच्या इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. म्हणजे 1.2 लिटर आय व्हीटीइसी पेट्रोल इंजिन मिळणार आहे, जे 90 एचपी पॉवर व 110 एनएमच्या टॉर्कची शक्ती प्रदान करेल. याला पाच स्पीड गिअरबॉक्स जोडले आहेत.

Related Stories

मार्च महिन्यात वाहन नोंदणीत घसरण

Amit Kulkarni

जेएलआरच्या नव्या गाडीचे बुकिंग सुरू

Patil_p

ऑगस्टमध्ये वाहनांची किरकोळ विक्री 8 टक्क्यांनी वाढली

Amit Kulkarni

कियाच्या कॅरेन्सला भरभरून प्रतिसाद

Patil_p

स्कोडासाठी भारत तिसरी मोठी बाजारपेठ

Patil_p

रॉयल इनफिल्डची ‘मीटीओर’ लवकरच

Patil_p
error: Content is protected !!