Tarun Bharat

होंडाच्या नव्या अमेझचे बुकिंग सुरु

Advertisements

वृत्तसंस्था/ मुंबई

होंडा कार इंडिया यांनी आपली नवी अमेझ मोटार बाजारात दाखल करण्याचा निर्णय घेतला असून या गाडीचे बुकिंग खुले झाले आहे.

ग्राहकांना सदरची नवी गाडी घ्यायची असेल तर कंपनीच्या संकेत स्थळावर किंवा अधिकृत विक्रेत्यामार्फत घेता येणार आहे. सदरच्या गाडीसाठी ग्राहकांना 21 हजार रुपये विक्रेत्यांकडून खरेदी करताना भरावे लागणार आहेत. तर ऑनलाईन बुकिंग करायचे झाल्यास 5 हजार रुपये आगाऊ भरावे लागणार आहेत. नव्या रंगांच्या पर्यायासह गाडी सादर होणार आहे. गाडीचा अंतर्गत आणि बाह्य लूक बदलण्यात आला आहे.

महिन्याअखेर होणार लाँचिंग

यावेळी बोलताना होंडा कार इंडिया लिमिटेडचे उपाध्यक्ष राजेश गोयल म्हणाले, 2013 मध्ये दाखल झालेल्या अमेझ या गाडीने ग्राहकांची मोठी पसंती प्राप्त केली आहे. आजवर या गाडीच्या ग्राहकांची संख्या साडेचार लाखांवर पोहचली आहे. भारतातील कुटुंबीयांची ही आवडती गाडी असल्याचा दावा करण्यात आला.

Related Stories

‘ओला’ 2 हजार 400 कोटी रुपये गुंतवणार

Patil_p

ऑटो डीलर्सची 300 शोरुम्स बंद

Patil_p

‘ऑडी ए8एल’चे बुकिंग सुरु

Amit Kulkarni

सुझुकीची मोटरसायकल विक्री तेजीत

Amit Kulkarni

इसुझु मोटर्सच्या प्रमुखपदी वाटारु नाकानो

Amit Kulkarni

ऍम्बेसेडर कारचे इलेक्ट्रिक मॉडेल

Patil_p
error: Content is protected !!