Tarun Bharat

होती 2 हजाराची नोकरी… आज चंद्रावर जमीन

Advertisements

ही कहानी आहे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हय़ातील नागरिक हरीष महाजन यांची. एकेकाळी ते अवघ्या 2 हजार रुपयाच्या मासिक वेतनावर नोकरी करीत असत. आज त्यांनी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. त्यांच्या या यशाचा मार्ग त्यांच्या अविरत कष्टातून आणि तरल कल्पना शक्तीतून गेला आहे.

हरीष महाजन हिमाचल प्रदेशातील दुसरे असे नागरिक आहेत की ज्यांनी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. चंदावर जमीन घेण्यासाठी त्यांनी न्यूयॉर्कच्या इंटरनॅशनल लुनार लँडस् सोसायटी या संस्थेत आपल्या नावाची नोंदणी केली होती. त्यांनी चंद्रावर एक एकर जमीन घेतली आहे. या जमिनीची कागदपत्रे त्यांना या संस्थेने ऑनलाईन पाठविली आहे. ही जमीन लेकस सोमनिओरम (लेक ऑफ ड्रिम) या चंद्रावरील प्रदेशात आहे. ही जमीन त्यांनी आपली पत्नी पूजा हिला तिच्या वाढदिवसानिमित्त भेट दिली आहे. आज त्यांचा स्वतःचा मोठा बांधकाम व्यवसाय असून लाखो रुपयांची कमाई ते करतात. मात्र, आपल्या दोन हजार रुपयांच्या नोकरीचे दिवस ते विसरलेले नाहीत. ज्या परिस्थितीत आपण वर आलो त्या परिस्थितीत जे आज आहेत त्यांना साहाय्य करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते मानतात. चंद्रावर जमीन आपण केवळ एक थ्रील म्हणून घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या जमीन खरेदीची चर्चा मात्र भरपूर होत आहे.

Related Stories

देव तारी त्याला कोण मारी?

Patil_p

नवी संसद

Patil_p

गुगलकडून ‘कोरोना वॉरियर्स’ साठी खास डुडल

prashant_c

जागतिक योग दिनानिमित्त सोमवारी राज्यस्तरीय ‘योगयज्ञ’

Rohan_P

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रे आता पुस्तकरूपात!

Rohan_P

भारतीय नवजात तुलनेत कमी रडतात

Amit Kulkarni
error: Content is protected !!