Tarun Bharat

होनगा येथील देवस्थानचा कारभार पारदर्शक

वार्ताहर/ काकती

होनगा येथे अनेक मंदिरे आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार कमिटीने विकास केला आहे. देवस्थानचा कारभार पारदर्शक ठेवला आहे. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला नाही. सर्वजण भक्तीभावाने सर्वजण एकजुटीने काम करत आहेत. मात्र देवस्थान रक्षण समितीच्या नावाखाली कट कारस्थान करणाऱया आणि जनतेची दिशाभूल करणाऱया गजानन पावले यांचा धिक्कार करत असल्याचे देवस्थान कमिटीचे सदस्य व ता. पं. माजी सदस्य यल्लाप्पा आनंदाचे यांनी पत्रकार परिषदेवेळी सांगितले. श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या प्रांगणात शुक्रवारी ही पत्रकार परिषद झाली.

व्यासपीठावर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजाराम पाटील, पुंडलिक पाटील, भैरू कांबळे, अनिल आनंदाचे, कामाण्णा नाईक, प्रकाश पावले, लक्ष्मण नारायण आनंदाचे, संजय शिंदोळकर, सिद्धार्थ नाईक, जयवंत धुडूम, संजय पाटील, महादेव पुजारी फकिरा पाटील, इराप्पा पुजारी, सुरेश कुंभार, लक्ष्मण बाबू आनंदाचे, गंगाराम बेळशेटकर, गुंडू केसरकर, नारायण कालकुंद्री, भैरू य. पाटील, सुभाष होनगेकर, बाबू सांबरेकर उपस्थित होते.

कार्यक्रमात अरुणनाथ बुवा यांनी होनगा येथील मंदिराबाबत गैरप्रकार करणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱयांकडे करणाऱया निवेदनाच्या वृत्ताचे वाचन केले. यावेळी पुढे यल्लाप्पा आनंदाचे म्हणाले, देवस्थानच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी गावची बैठक घेऊन देवस्थानच्या हिशेब समोर ठेवण्यात येतो. कोणत्याही देणगीदार भाविकाला देणगीसाठी बळजबरी केली नाही. गावातील शेतकरी बांधवांनी भक्तीभावाने 80 ते 90 लाखाची देणगी मंदिरासाठी स्वखुशीने दिलेली आहे. अरुण पाटील यांनी ऑडिट व हिशेबाचे वाचन करून् माहिती दिली.

देवस्थानाचे अध्यक्ष राजाराम पाटील

सर्व मंदिराचा विकास व जीर्णोद्धार ग्रामस्थ व भाविकांच्या सूचनांचे पालन करून करण्यात आला आहे. मंदिराच्या खोटय़ा अफवांना कोणीही थारा देऊ नये. श्री काळभैरवनाथ, श्री कलमेश्वर भाविकांसाठी निवास वसतीगृह व कार्यालय अशी विकासकामे झाली आहे.

लक्ष्मण आपुणी आनंदाचे

पूर्वीपासून नावे बदलत आली आहेत. श्री काळभैरवनाथ अनेक नावाने संबोधतो. भैरीदेव सत्याचा आहे धर्माचा आहे. आमच्यावर खोटे आरोप करण्यात येऊ नयेत. तसेच नारायण भैरू कालकुंद्रीकर (एक्स आर्मी), प्रकाश जयराम पावले, देवस्थान कमिटीवर खोटे आरोप करण्यात येत आहेत. कोणती देवस्थान रक्षण समिती असेल त्यांनी ग्रामस्थांच्या बैठकीत येऊन पारदर्शक कारभाराची शहनिशा करावी, असे सांगितले. यावेळी मोठय़ा र्सख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

Related Stories

प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिराला 362 वर्षे पूर्ण 362 मशालींनी उजळला किल्ले प्रतापगड

mithun mane

हुबळी-एलटीटी रेल्वे 9 दिवसांसाठी रद्द

Patil_p

बेळगाव मोर्चाला खानापुरातील युवावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार

Amit Kulkarni

मराठी शाळांच्या कानडीकरणाचा घाट

Amit Kulkarni

जागा विनियोगाच्या प्रस्तावावर कॅन्टोन्मेंट बैठकीत चर्चा

Amit Kulkarni

‘बलिदान मास’ शुक्रवारी सांगता

Amit Kulkarni