Tarun Bharat

होनगा लक्ष्मीदेवी यात्रा साधेपणाने साजरी

मिरवणुकीने देवीच्या मूर्तीचे मंदिरात आगमन : ओटी भरण्यास सुवासिनींची गर्दी, महाप्रसादाचे आयोजन

वार्ताहर /काकती

होनगा येथील ग्रामदेवता लक्ष्मीदेवी यात्रा बुधवारी ग्रामस्थ व माहेरवासिनींच्या उपस्थितीत साधेपणाने पार पडली. देवीची ओटी भरण्यासाठी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत भाविकांची गर्दी झाली होती.

मंगळवार दि. 8 रोजी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सायंकाळी पाटील घराण्याच्या देवघरात साखरपुडय़ाचे विडे काढण्यात आले. हक्कदारी व ग्रामस्थ यांचे पाटील घराण्याच्या देवघरातून सवाद्य मिरवणुकीने श्री लक्ष्मी मंदिरात आगमन झाले. हक्कदारी मानकरी यांच्या उपस्थितीत ओटी भरण्यात आली. देवीला मनोभावे मंगलारती करून नैवेद्य दाखविण्यात आला.

मंगळवारी पहाटे मंदिरातील देवीचे प्रमुख पुजारी महादेव बसवाणी पुजारी यांच्या घरी देवी स्थानापन्न करण्यात आली. कचेरी गल्लीतून मास्ती व मातंग यांच्या घरी पूजा विधी व नैवेद्य करण्यात आला. तेथून सवाद्य मिरवणुकीने पुजारी बंधू यांच्या घरी बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले. ढळगारे यांच्या हक्कदारीच्यावतीने शस्त्र टोचण्याचा विधी पार पडला. पाटील घराण्याच्यावतीने देवीला गाऱहाणे घालण्यात आले. दुपारी 12 च्या सुमारास देवीच्या सवाद्य मिरवणुकीला भाविकांच्या उपस्थितीत मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. दुपारी एकच्या सुमारास ग्राम पंचायतसमोरील गदगेजवळ आगमन झाले. गदगेवर देवीचे भक्तीभावाने स्थानापन्न करण्यात आले. ढळगारे बंधूंच्यावतीने गदगेसमोर धान्यांची विलोभनीय आरास मांडून पूजाविधीचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. गाऱहाणे घालून मानाचा विधी पार पडला. बेन्नाळी पाटील घराण्याची प्रथम मानाची ओटी भरण्यात आली. रात्री उशिरा यात्रा सांगता कार्यक्रमप्रसंगी गाऱहाणे घालण्यात आले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Related Stories

काकतिवेस रोडवर हजारो लिटर पाणी वाया

Rohit Salunke

पाडव्यानिमित्त गवळी बांधवांनी सजविल्या म्हशी

Patil_p

पोलीस कर्मचाऱयांसाठी बांधणार 20 हजार घरे

Omkar B

निवडणूक संदर्भात कागदपत्रे देण्यास टोलवाटोलवी

Amit Kulkarni

मटका-जुगारावरील कारवाई : किती खरी किती खोटी?

Amit Kulkarni

सुभाषचंद्रनगरमधील रस्त्याची चाळण

Amit Kulkarni