होबार्ट : ऑस्ट्रेलियातील आगामी बिग बॅश टी-20 लीग क्रिकेट हंगामासाठी होबार्ट हरिकेन्स संघाने यॉर्कशायरचा जॉर्डन थॉम्पसनशी करार केला. आता होबार्ट हरिकेन्स संघात इंग्लिंशमन थॉम्पसन आणि अष्टपैलू संदीप लामिचने यांचा समावेश राहील.
यॉर्कशायर संघाकडून खेळताना थॉम्पसनने बॉब विलीस करंडक क्रिकेट स्पर्धेत पाच सामन्यामध्ये फलंदाजीत 234 धावा तर गोलंदाजीत 15 गडी बाद केले आहेत. या कामगिरीमुळे होबार्ट हरिकेन्स क्लबने थॉम्पसनला करारबद्ध केले. ऑस्ट्रेलियातील 11 व्या बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेतील होबार्ट हरिकेन्सचा सलामीचा सामना 8 डिसेंबरला सिडनी सिक्सर्स संघाविरुद्ध होणार आहे.