Tarun Bharat

होमक्वारंटाईन शिक्क्यामुळे इन्फेक्शन

तळेबाजार येथील चाकरमान्यांबाबत घडला प्रकार

प्रतिनिधी / देवगड:

मुंबईहून ई-पास घेऊन सिंधुदुर्गात चाकरमानी येत आहेत. शुक्रवारी मुंबईहून देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे दोन युवती आल्या. खारेपाटण तपासणी नाक्यावर त्यांच्या हातावर होमक्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. मात्र, या शिक्क्याचे इन्फेक्शन होऊन हातावर फोड येऊन काळा डाग झाला आहे. त्यामुळे या चाकरमानी युवती घाबरल्या आहेत. क्वारंटाईन शिक्क्यासाठी नेमकी कोणते केमिकल वापरले जाते, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात चाकरमानी येत आहेत. या सर्व चाकरमान्यांची सिंधुदुर्गच्या सीमेवर खारेपाटण येथे तपासणी केली जाते. तपासणी केल्यानंतर त्यांच्या हातावर होमक्वारंटाइनचा शिक्का मारला जातो. असा शिक्का देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील मनोज गावडे यांच्या दोन बहिणींच्या हातावर मारण्यात आला. शुक्रवारी रात्री 8.30 वा. सुमारास हा शिक्का मारल्यानंतर त्या घरी पोहोचल्यावर त्यांनी हात पाहिल्यानंतर त्या घाबरल्या. होम क्वारंटाईनसाठी मारलेल्या शिक्क्याचे त्यांना इन्फेक्शन होऊन हातावर फोड आले. तसेच शिक्का मारलेल्या भागावर काळा डाग पडला. क्वारंटाईनच्या शिक्क्यासाठी नेमकी कोणती शाई अथवा केमिकल वापरले जाते असा प्रश्न पडला असून हे घातक असल्याची प्रतिक्रिया येत आहे.

तो प्रकार ऍलर्जीमुळे

देवगड-तळेबाजार येथे मुंबईहून आलेल्या दोन युवतींच्या हातावर होमक्वारंटाईनचा शिक्का मारल्यानंतर त्यांच्या त्वचेवर फोड आल्याचे निदर्शनास आले आहेत. परंतु या शाईमध्ये कोणताही दोष नसून निवडणुकीच्यावेळी वापरली जाणारीच शाई आहे. सध्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत हीच शाई वापरण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही तक्रार नाही. परंतु जर एखाद्या व्यक्तीच्या त्वचेला या शाईची ऍलर्जी असेल तर असा प्रकार घडू शकतो. जिल्हय़ातील आतापर्यंत असा प्रकार देवगड येथीलच आढळून आला आहे. त्यांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यावर उपचार करून घ्यावेत, असे खारेपाटण तपासणी नाका येथील व खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांनी सांगितले.

Related Stories

केवळ दैव बलवत्तर म्हणूनच…

Anuja Kudatarkar

खाकी वर्दीने घडवले माणुसकीचे दर्शन ; कातकरी महिलेला दिला आधार

Anuja Kudatarkar

सावंतवाडीत सक्रिय रुग्णसंख्या तीन

NIKHIL_N

रत्नागिरी : कोकणात मच्छिमारांसह शेतकऱ्यांची चळवळ उभारणार

Archana Banage

अपघातात जखमी झालेल्या गोवळ येथील तरूणाचा मृत्यू

Patil_p

बिबटय़ांच्या झटापटीत एका बिबटय़ाचा मृत्यू

Patil_p