Tarun Bharat

होम आयसोलेशनसाठी नवे दिशानिर्देश

17 दिवसांनी आयसोलेशन संपुष्टात आणता येणार : 10 दिवसांपासून ताप आलेला नसावा : दर 8 तासांनी मास्क बदलावा लागणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या सौम्य लक्षणे (व्हेरी माइल्ड) किंवा प्री-सिम्प्टोमॅटिक रुग्णांसाठी होम आयसोलेशनच्या दिशानिर्देशांमध्ये बदल केले आहेत. होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण प्रारंभिक लक्षणे दिसून आल्याच्या 17 दिवसांनी आयसोलेशन संपुष्टात आणू शकतील. प्री-सिम्प्टोमॅटिक प्रकरणांमध्ये सॅम्पलिंगच्या दिवसापासून 17 दिवस मोजले जाणार आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये 10 दिवसांपासून ज्वर आलेला नसावा. आयसोलेशन संपल्यावर कोरोना चाचणी करणे अनिवार्य नसेल.

तत्पूर्वी आरोग्य मंत्रालयाने 27 एप्रिल रोजी दिशानिर्देश प्रसिद्ध करत सौम्य लक्षणे किंवा प्री-सिम्प्टोमॅटिक रुग्णांना होम आयसोलेशनची अनुमती दिली होती. आता होम आयसोलेशनयुक्त रुग्ण तसेच त्यांची देखभाल करणाऱयांसाठी नवे निर्देश प्रसिद्ध केले आहेत. दोघांनाही ट्रिपल लेयर मास्क परिधान करणे अनिवार्य असेल.

रुग्णांसाठी 10 निर्देश

1 सदैव ट्रिपल लेयरचा मेडिकल मास्क परिधान करावा लागेल. दर 8 तासांनी तो बदलावा लागेल. मास्क ओला किंवा मळल्यास त्वरित बदलावा लागणार.

2 वापरानंतर मास्कची विल्हेवाट लावण्यापूर्वी 1 टक्के सोडियम हायपो-क्लोराइटमुळे संसर्गरहित (डिसइन्फेक्ट) करावा लागणार आहे.

3 रुग्णाला स्वतःच्या खोलीतच रहावे लागणार. अन्य कुटुंबीय विशेषकरून वृद्ध, हृदयविकार असलेल्या लोकांशी संपर्क होऊ देऊ नये.

4 रुग्णाने पुरेसा आराम करावा, अधिकाधिक पाणी किंवा द्रव्यपदार्थांचे सेवन करत रहावे.

5 श्वसनाच्या स्थितीवर नजर ठेवण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे.

6 साबण-पाणी किंवा अल्कोहॉलयुक्त सॅनिटायजरने किमान 40 सेकंदांपर्यंत हात स्वच्छ करत रहावेत.

7 वैयक्तिक सामग्रींचा इतरांना वापर करू देऊ नये.

8 खोलीच्या ज्या भागाला वारंवार स्पर्श करावा लागतो, (दरवाजाची कडी, हँडल) त्यांना 1 टक्के हायपोक्लोराइट सोल्युशनने स्वच्छ करावे.

9 रुग्णाला डॉक्टरांचे निर्देश तसेच औषधांशी संबंधित सल्ला मानावा लागेल.

10 रुग्णाने स्वतःच्या स्थितीवर देखरेख ठेवावी. दररोज शरीराचे तापमान पडताळून पहावे. स्थिती बिघडल्याची लक्षणे दिसून आल्यास त्वरित कळवावे.

रुग्णाची देखभाल करणाऱयासाठी 12 निर्देश

1 रुग्णाच्या खोलीत गेल्यास ट्रिपल लेयरयुक्त मेडिकल मास्क परिधान करावा. मास्क वापरताना त्याच्या समोरील भागास स्पर्श करू नये. मास्क ओला किंवा मळल्यास त्वरित बदलावा. वापरानंतर मास्कला डिस्कॉर्ड करा आणि हात चांगल्याप्रकारे स्वच्छ करून घ्यावेत.

2 देखभाल करणाऱयांनी स्वतःचा चेहरा, नाक किंवा तोंडाला स्पर्श करू नये.

3 रुग्ण किंवा त्याच्या खोलीच्या संपर्कात आल्यास हात चांगल्याप्रकारे धुवून घ्यावेत.

4 स्वयंपाक करण्यापूर्वी आणि नंतर, जेवणापूर्वी, टॉयलेटमधून आल्यावर आणि हात अस्वच्छ वाटल्यास चांगल्याप्रकारे धुवून घ्यावेत. हातांना साबण-पाण्याने 40 सेकंदांपर्यंत स्वच्छ करावे.

5 साबण-पाणीने हात धुवून घेतल्यावर डिस्पोजेबल पेपर नॅपकिनने पुसून घ्यावेत. पेपर नॅपकिन नसल्यास स्वच्छ टॉवेलने हात पुसावेत.

6 रुग्णाच्या शरीरातून बाहेर पडणाऱया द्रव्याच्या संपर्कात येऊ नये. रुग्णाला सांभाळतानाच ग्लोव्हज वापरा. ग्लोव्हज वापरण्यापूर्वी आणि वापरून झाल्यावर हात स्वच्छ करावेत.

7 रुग्णासोबत सिगारेट शेअर करणे, त्याची भांडी, टॉवेल, चादरीच्या संपर्कात येऊ नये.

8 रुग्णाचे भोजन त्याच्या कक्षातच पोहोचवावे.

9 रुग्णाची भांडी ग्लोव्हज परिधान करून साबण किंवा डिटर्जंटने स्वच्छ करावीत. ग्लोव्हज उतरविल्यावर हात स्वच्छ करावेत.

10 रुग्णाच्या खोलीची स्वच्छता करताना, कपडे किंवा चादर धुताना ट्रिपल लेयर मेडिकल मास्क आणि डिस्पोजेबल ग्लोव्हज वापरावेत. ग्लोव्हज वापरापूर्वी आणि उतरविल्यावर हात चांगल्याप्रकारे धुवून घ्यावेत.

11 रुग्ण वेळोवेळी औषधे घेतोय की नाही याची काळजी घ्यावी.

12 देखभाल करणाऱया व्यक्तीने स्वतःच्या आरोग्याचे निरीक्षण करावे. दररोज शरीराच्या तापमानाची तपासणी करावी. कोरोनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय अधिकाऱयाशी संपर्क साधावा.

Related Stories

औषधांवरील करात सूट पेट्रोल-डिझेल ‘जीएसटी’बाहेरच!

Patil_p

खराब हवामानामुळे प्रतिदिन ८ जणांचा मृत्यू

Patil_p

आधार’प्रकरणी सरकारचा यूटर्न

Patil_p

महाराष्ट्रात पेट्रोल दर शंभरीच्या उंबरठ्यावर

Patil_p

पेट्रोल-डिझेल दराचा देशात भडका सुरूच

Patil_p

सरकारी कर्मचाऱयांच्या अनावश्यक खर्चाला आळा

Patil_p