Tarun Bharat

होय, मी भगवाधारी आहे…

Advertisements

डिंपल यादव यांना योगींचे प्रत्युत्तर

उत्तरप्रदेश निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यांमध्ये राजकीय नेत्यांमधील वाप्युद्ध देखील तीव्र होत चालले आहे. प्रचारसभेदरम्यान सप अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कपडय़ांच्या रंगाची तुलना लोखंडाला लागणाऱया गंजाशी केली होती. डिंपल यांच्या या विधानावर योगींनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी डिंपल यांची टिप्पणी सनातन धर्म आणि संत समाजाचा अपमान करणारी असल्याचे म्हटले आहे.

समाजवादी पक्षाच्या नेत्यांची विधाने लोकांनी ऐकली असतील. यातील एक विधान सर्वांचा अपमान करणारे आहे. तसेच या विधानाद्वारे सनातन धर्माचाही अपमान झाला आहे. डिंपल यादव यांनी भगव्याला लोखंडाला लागणाऱया गंजाशी जोडले आहे. परंतु मी भगवाधारी आहे आणि प्रत्येक गोरखपूरवासी भगवाधारी असल्याचे मला वाटते असे उद्गार योगींनी काढले आहेत.

आपण भगवाधारी आहोत असे सर्वांनी म्हणायला हवे. उत्तरप्रदेशातील प्रत्येक रहिवासी आपण भगवाधारी असल्याचे म्हणेल, कारण हा भगवा निसर्गाच्या ऊर्जेचा रंग आहे. सूर्योदय होत असताना सूर्याचा रंग देखील भगवा असतो. अग्नि आम्हा सर्वांच्या ऊर्जेचे मूळ असून त्याचा रंग देखील भगवा असल्याचे म्हणत योगींनी उपस्थित जनसमुदायाला ‘मैं भी भगवाधारी हूं’ असा नारा देण्यास सांगितले.

सप नेत्या आणि माजी खासदार डिंपल यादव यांनी कौशांबी जिल्हय़ातील सिराथू मतदारसंघात सप उमेदवार पल्लवी पटेल यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेला संबोधित करताना लोखंडाला लागणाऱया गंजाशी भगव्याला जोडले होते. इंजिन लोखंडी असते, परंतु त्यावर गंज लागते, त्याच रंगाचे कपडे मुख्यमंत्री घालतात. गंजाचा रंग असलेले इंजिन हटविणे गरजेचे असल्याचे डिंपल म्हणाल्या होत्या.

Related Stories

देशात 43,893 नवे कोरोना रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 79.90 लाखांवर

datta jadhav

7 वर्षांमधील आकडेवारी द्या!

Patil_p

शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या सुप्रिया सुळेंसह अनेक खासदारांना गाझिपूर बॉर्डरवर रोखलं

Abhijeet Shinde

मोदींविरोधात पोस्टरबाजी ; दिल्लीत 25 जणांना अटक

Patil_p

केंद्र सरकार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषी कायदे मागे घेणार

Abhijeet Shinde

उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 3161 वर

Rohan_P
error: Content is protected !!