Tarun Bharat

होय मुख्यमंत्री मला भेटले मात्र स्वगृही बोलावण्याबाबत चर्चा नाही- सुधीर कांदोळकर

प्रतिनिधी/म्हापसा

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आपली भेट झाली आहे. त्यांनी आपल्यास थेट विचारले आहे तुमची पुढची वाटचाल कशी काय? आपली वाटचाल सरळ आहे. मी काँग्रेस पक्षात आहे आणि कॉग्रेसचे काम करीत आहे. शिवाय लोकांचेही काम करीत आहे. लोकांची भावना अशी आहे, पक्षासाठी नव्हे तर तुमच्यासाठी वैयक्तिक आम्ही मतदान करणार आहोत. म्हापशाच्या विकासासाठी तुम्ही निवडणुकीच्या रिंगमात हवे आहेत. भाजपात स्वगृही परतण्याची आपल्यास कुणी विनंतीही केली नाही. माझ्याकडे कुणी आले आहेत त्यांच्याकडे माझ्या मनातील काही प्रश्न आहेत ते मांडले आहेत अशी माहिती म्हापशाचे नगरसेवक तथा काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांनी दै. ‘तरुण भारत’ला दिली.

मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला गाजर दाखवून पुन्हा स्वगृही परतण्याची विनंती केली काय असा प्रश्न नगरसेवक सुधीर कांदोळकर यांना विचारला असता त्यांनी वरील माहिती दिली. पुढे बोलताना श्री. कांदोळकर म्हणाले की, आज बाहेरून आलेले पक्ष आहेत. आप, टिएमसी, मगो, राष्ट्रीयवादी भाजप पक्ष आहे. सर्वांचा संपर्क माझ्याकडे येतो. ते माझ्याकडे पुढची राजकीय रणनीती कशी करावी याबाबत बोलणी करीत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपने मला तिकीट नाकारली. मी सलग 22 वर्षे निस्वार्थीपणे कार्य केले. आपला एकच दृष्टीकोन होता म्हापशाचा विकास त्यावेळी आपल्यास असे दिसत होते की केंद्रात भाजप सरकार आहे येथे नगरपालिका आहे मात्र म्हापशाचा विकास काहीच झाला नाही. नगरसेवक झाल्यापासून आपली एक तळमळ होती विकास व्हावा, रस्त्याना नाहरकत दाखला वा अन्य काही ज्या म्हापशासाठी गरजा होत्या त्या मान्य करण्यासाठी आपण सदैव प्रयत्न केला आहे. यासाठी धडपड करावी लागत होती असे त्यांनी सांगितले.

म्हापशात काँग्रेस गट कार्यान्वित झाला आहे. ऍड. शशांक नार्वेकर धुरा घेऊन पुढे जात आहे. अनेकांनी नवीन कार्यकारिणीचे सदस्यपद घेतले आहे. म्हापशात 12 ऑक्टोबर रोजी सायं. 6 वा. चिदंडबरम म्हापसा प्रगती संकूलात येणार आहे आणि त्याबाबत तयारीही जोरात चालली असल्याची माहिती सुधीर कांदोळकर यांनी दिली.

 लोकांची कामे, विकासासाठी असतात त्यासाठी आपण कामे घेऊन सर्वत्र जात असतो. बार्देशचे मंत्री मायकल लोबो यांच्याकडेही आपण कामे घेऊन जातो. स्वगृहीबाबत मी काहीच बोलत नाही. सध्या मी काँग्रेस पक्षात आहे व काँग्रेसच्या पक्षावर मी पुढे निवडणुकीत समोर जाणार आहे. विविध पक्षाचे नेते आपल्याकडे येतात त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आपले कर्तव्य आहे असे श्री. कांदोळकर म्हणाले.

Related Stories

पराभवानंतर महेंद्र चंडाळे यांचा शिवसेना शहर प्रमुख पदाचा राजीनामा

Archana Banage

पाव्हल्युचेंकोव्हाला दुखापत

Patil_p

खतासाठी कार्यालयात मोठी गर्दी

Rohit Salunke

विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स कोसळला

Omkar B

सीएसकेला मिळाली सरावाची परवानगी

Patil_p

खानापूर रोड स्मार्ट तर स्टेशनरोडची झाली दुर्दशा

Patil_p