Tarun Bharat

होळी, धुलिवंदन शांततेत साजरी

होली का दहन मोजक्याच लोकांच्यात -रात्री आठनंतर संचार बंदी लागू

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने होळी हा सण सर्वत्र शांततेत साजरी करण्यात आला. तसेच धुलिवंदन दिवशीही चिकन, मटण खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. कोरोनाची धास्ती वाढल्याने नागरिक घरात राहणे पसंत करत आहेत.

       गत वर्षीही सर्वच सण साजरे करण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. यंदा मात्र काही अंशी सुट देत होळी सण साजरी करण्यावर सर्वांनीच भर दिला. सकाळपासून घराघरात पुरळपोळीचा नैवेद्य बनवण्यात येत होता. फक्त घरातील मोजक्याच सदस्यांसाठी पुरळपोळी गृहिणीनी बनवली. घराबाहेर छोटी होळी करून  नैवेद्य दाखवण्यात आला. दुसऱया दिवशीही धुलिवंदन या दिवशी घरा-घरात मटण, चिकनचा आस्वाद घेतला जातो. यासाठी सकाळी दुकानांच्या बाहेर रांगा लागतात. यंदा मात्र सकाळी 10 वाजेपर्यंत दुकाने उघडण्यात आलेली नव्हती. तर काही विक्रेत्यांनी दुकाने बंदच ठेवली होती. यामुळे खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळत होते. दिवसभर शहरात शांततेचे वातावरण होते. सायंकाळी संचारबंदी असल्याने कारवाईच्या भीतीने विक्रेते दुकाने वेळेत बंद करत आहेत.

Related Stories

जनसंघर्ष टाळण्यासाठी जातिनिहाय जनगणना आवश्यक-

Patil_p

धारावी कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर; आज अवघ्या एका रुग्णाची नोंद

Tousif Mujawar

आदेशाचे उल्लंघन केल्याने 20 जणांवर गुन्हे

Amit Kulkarni

50 रूग्णांची झाली ऍटीबॉडी टेस्ट

Patil_p

नळ जोडण्यांची तपासणी सूरू

Patil_p

प्रतीक्षा संपली! शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार?

Abhijeet Khandekar