Tarun Bharat

होसकोटे येथे उद्योग खात्रीत भ्रष्टाचार

प्रतिनिधी/ बेळगाव

रामदुर्ग तालुक्मयातील होसकोटे ग्राम पंचायतीमध्ये मोठय़ा प्रमाणात रोजगार हमी योजनेंतर्गत भ्रष्टाचार झाला असून त्याची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होसकोटे गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत कुली कामगार घेवूनच काम करणे गरजेचे आहे. मात्र यंत्रांच्या सहाय्याने काम करुन त्या कुलीकामगारांची नावे दाखल करुन रक्कम लाटण्यात आली आहे. कोटय़ावधी रुपयांचा भ्रष्टाचार यामध्ये झाला आहे. तेंव्हा याची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

महसुल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आर. बी. पुजेर, एस. एम. होसपेटी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

राजहंसगड येथे विकासकामाचा शुभारंभ

Amit Kulkarni

जायंट्स सखीतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार

Patil_p

सागरे लक्ष्मीयात्रेसाठी बससेवा सुरू

Amit Kulkarni

बाळासाहेब ठाकरे यांना रांगोळीतून अभिवादन

Omkar B

खेलो इंडिया ज्युडो स्पर्धेसाठी दिव्या-संध्याची निवड

Amit Kulkarni

परवानगीचा चेंडू जिल्हाधिकाऱयांच्या कोर्टात

Patil_p