Tarun Bharat

िजह्यात एसटी प्रवासी संख्येत होतेय वाढ

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यामध्ये एसटीच्या फेऱयाच्या संख्या वाढत असतानाच प्रवासी संख्याही  चांगलीच वाढली आह़े  सोमवारी जिह्यात तब्बल 13 हजार 967 प्रवाशांची  नोंद करण्यात आल़ी विशेषतः ग्रामीण भागातून एसटीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आह़े सर्वाधिक प्रवासी संख्या 4 हजार 86 ही देवरूख आगारातून झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

  जिह्यात आता एकूण 600 हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़  दरम्यान एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे, यासाठी संप सुरू असतानाच जिह्यात मंगळवारी 300 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े राज्यभर कर्मचारी संपावर ठाम असताना रत्नागिरीत कर्मचारी कामावर हजर राहत आहेत़ असे असले तरी चालक-वाहक कामावर हजर राहावेत, यासाठी एसटीच्या अधिकाऱयांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत़ मंगळवारीही एसटीच्या कर्मचारी संघटनांशी चर्चा करण्यात आल़ी मात्र कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचेच दिसल़े 

Related Stories

भांबेडमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणाची होणार चौकशी

Omkar B

गोठणे-दोनिवडे येथील पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचला

Patil_p

राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळावर नमिता कीर

Patil_p

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापूर पथकाची कारवाई

Anuja Kudatarkar

मोहिम स्वागतार्ह…पण रुग्णांची परवड आधी रोखा

Amit Kulkarni

‘आत्मनिर्भर’च्या वाटेवरील चटके!

NIKHIL_N