Tarun Bharat

।। अथ श्रीरामकथा ।।

जटायू आणि रावणाचे घनघोर युद्ध झाले आणि जटायूचे पंख कापून रावणाने त्याला खाली पाडले. तो जखमी होऊन विव्हळत होता. तिकडे सीतेला शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या लक्ष्मणाला सीतेचे खाली पडलेले काही दागिने दिसले. त्याने ते रामाला दाखवले. रामाने ते सीतेचेच आहेत हे ओळखले.

 त्यांचा माग काढीत त्याच मार्गाने ते पुढे चालू लागले. आणखी थोडे चालल्यावर त्यांना आणखी काही आभूषणे मिळाली आणि थोडय़ा अंतरावर घायाळ होऊन खाली पडलेला एक विशालकाय पक्षी दिसला. तोच जटायू होता. त्याला पाहिल्यावर रामाने त्याची विचारपूस केली. तेव्हा जटायूने सीतेला रावणाने लंकेला पळवून नेल्याचे, रावणाबरोबर आपले युद्ध झाल्याचे, आपले पंख रावणाने तलवारीने कापून टाकल्याचे सांगितले. काही अंतर शोध घेत गेल्यानंतर वाटेत त्यांना जांबुवंत, अंगद, हनुमान इ.नीही सीताशोधाच्या कामात सहाय्य केले. त्या सर्वांना वाटेत पंख नसलेला एक विशालकाय पक्षी संपाती-जटायूचा भाऊ भेटला. तो या सर्वांना प्रथम खाऊ इच्छित होता. पण जांबुवंताने त्याला रामव्यथा सांगितली. अंगद आणि इतरांनी त्याला त्याचा भाऊ जटायूची हकिगत आणि त्याच्या मृत्यूची वार्ता सांगितली. तेव्हा संपाती फार दुःखी झाला. संपातीचे पंख सूर्याकडे  झेपावताना जळून गेल्याने तो उडू शकत नव्हता. परंतु त्याचा पुत्र सुपार्श्व याने सीतेला पळवून नेत असणाऱया रावणाला रोखले होते. त्याच्याशी युद्ध करायला तयार झाला होता. पण रावण त्याच्यासमोर हात जोडून गयावया करू लागला आणि त्याच्या तावडीतून सुटला.

  अशा प्रकारे संपातीने अंगदाकडे सीतेला रावणाने पळवून नेल्याची पुष्टी दिली. पंख नसल्याने संपाती रावणाशी लढू शकला नाही. फार पूर्वी चंद्रमा नावाच्या ऋषींनी पंख जळल्यावर त्याच्यावर उपचार केले होते. तसेच त्रेता युगात जेव्हा सीतेच्या शोधात वानर येतील, तेव्हा त्यांच्या दर्शनाने त्याला त्याचे पंख परत मिळतील असा आशीर्वाद दिला होता.

 त्याप्रमाणे अंगद आणि हनुमंताचे दर्शन झाल्यावर त्याच्यात नवचैतन्य निर्माण झाले आणि आपल्या तीव्र अशा दूरदृष्टीचा वापर करून सांगितले की, सीतामाता अशोक वनातील वाटिकेत सुरक्षित बसली आहे. तिकडे जाऊन तुम्ही तिला सोडवून आणा असे संपातीने सर्व वानरांना सांगून लंकेला जाण्यास प्रवृत्त केले. अशा प्रकारे संपातीनेही सीतेच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावली.

परोपकारशून्यस्य धिङ् मनुष्यस्य जीवितम्।

जीवन्तु पशवो येषां चर्माण्युपकरिष्यति।।…..

 जो परोपकार करीत नाही, त्या माणसाचा धिक्कार असो. पशु खूप जगोत, कारण त्यांचे कातडेही परोपकार करते!

Related Stories

भक्ताने सत्वगुणावरही विजय मिळवावा

Patil_p

‘शरपंजरी’ खाजनशेतीला भगिरथाची प्रतीक्षा

Patil_p

सातही वृषभ कृतान्तकल्प

Patil_p

संसदेतील जुगलबंदी

Patil_p

भूपा अंतरिं कामिती

Patil_p

उन्हाच्या अंतरंगात…

Patil_p