Tarun Bharat

१० एप्रिलपासून १८ वर्षांवरील व्यक्तींना मिळणार बूस्टर डोस

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोनाविरुद्धची लढाई अजूनही सुरू आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. याला देशात मोठा प्रतिसादही मिळाला. देशात प्रत्येकाला दोन डोस देण्यात आले आहे. अजूनही काही लोक डोस घेत आहेत. आता सरकारने बूस्टर डोसबाबत मोठी घोषणा केली आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की १० एप्रिलपासून, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व प्रौढांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. हे बूस्टर डोस खाजगी लसीकरण केंद्रांवर देखील घेता येणार आहेत.

तर सरकारी लसीकरण केंद्रांवर पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी मोफत लसीकरण कार्यक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. यासोबतच आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोसही चालू राहील आणि त्याचा वेग वाढवला जाईल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

सरकारने म्हटले आहे की १५वर्षांपेक्षा जास्त वयाच्या देशातील ९६ टक्के लोकसंख्येला कोविड-१९ लसीचा किमान एक डोस दिला गेला आहे, तर १५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या ८३ टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

Related Stories

धरणात बुडालेल्या डॉक्टरांना बाहेर काढताना कोल्हापुरचा जवान बुडाला ; बीडमधील घटना

Archana Banage

तामिळनाडूचा ‘थाला’ कोण?

Patil_p

गुजरात ड्रग्ज प्रकरण : १६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल

Abhijeet Shinde

तृणमूल नेते अभिषेक बॅनर्जींना पुन्हा समन्स

Patil_p

फिरोजपूर घटनेची चौकशीसाठी पंजाब सरकारने उच्चस्तरीय समिती केली स्थापन

Sumit Tambekar

देशात 81,484 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav
error: Content is protected !!