Tarun Bharat

कोकण मार्गावर धावली ‘मोदी एक्सप्रेस’

Advertisements

तब्बल 1800 गणेश भक्तांनी केला प्रवास

मुंबई/प्रतिनिधी

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या १८०० चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्स्प्रेस’ कोकणाकडे रवाना झाली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप आमदार नितेश राणे यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. दादर स्थानकावरुन ही ट्रेन सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली आहे. दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी आमदार नितेश राणे यांनी मुंबई आणि परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी याआधीच ट्विट करून खास भेट देणार असल्याचे सांगितले होते.

या ट्रेनमधील प्रवाशांनी गणपतीची आरती म्हणत प्रवासाला सुरुवात केल्याचे व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच नितेश राणेंनी या ट्रेनसंदर्भात घोषणा केलेली. नितेश राणेंनी आज या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याआधीचे काही फोटो ट्विटरवरुन पोस्ट केलेत. यामध्ये गाडीवर ‘मोदी एक्सप्रेस’ विशेष ट्रेन असं स्ट्रीकर लावल्याचं दिसत आहे.“मोदीजींच्या संकल्पनेतून २२५ ट्रेन आम्ही कोकणवासीयांसाठी सोडल्या आहेत.

दरम्यान नितेश राणे यांनी याआधी मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मोफत अशा मोदी एक्स्प्रेसची घोषणा केली होती. ही ट्रेन १८०० प्रवाशांची असणार आहे. ७ सप्टेंबर(मंगळवार)सकाळी १० वाजता ही ट्रेन दादर स्टेशन वरून निघणार होती. हा पूर्ण प्रवास निशुल्क असणार आहे. विशेष म्हणजे या पूर्ण प्रवासात एक वेळचे जेवणसुद्धा देण्यात येणार आहे.

Related Stories

निराधार वृद्धेला मिळणार हक्काचा निवारा

NIKHIL_N

चिदंबरम यांच्या 9 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी

datta jadhav

पेगॅससने नाही तर मग देशात येऊन कुणी हेरगिरी केली- नवाब मलिक

Abhijeet Shinde

सावंतवाडीत घरफोडीचे सत्र सुरूच

Rohan_P

अतानूदासला पाच कोटी तर प्रविण जाधवला उपेक्षाच

Patil_p

लातूर : देवणी तालुक्यात एकाचा खुन, आरोपीला केली अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!