Tarun Bharat

२०० टक्के खरे ! राज ठाकरेंच्या ‘या’ टीकेला चंद्रकांत पाटलांचे समर्थन

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली. अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर केली होती. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या या टीकेचे समर्थन केले आहे. राज ठाकरेंच्या मताशी मी २०० टक्के सहमत आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. शिवाय त्यांनी काही उदाहरणे देखील दिली आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी दिलेले उदाहरण

  • ज्यावेळी भाजपने खा.संभाजीराजे छत्रपती राज्यसभेचे खासदारपद दिले.त्यावेळी दुसऱ्या मिनिटाला शरद पवार यांची प्रतिक्रिया दिली. आता पेशव्यांनी राजे ठरवणार का? अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी ब्राम्हण-ब्राम्हणेत्तर रंग दिला.
  • १ जानेवारीला भिमा-कोरेगाव दंगल झाली, तेव्हा दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यात भिडे-एकबोटे चा हात आहे.असा आरोप केला. पण त्यांना ब्राम्हण नेते म्हणायचे होते.

त्यांनी पुणेरी पगडी घालण्यास नकार दिला. पण पुणेरी पगडी ही महात्मा जोतीराव फुले यांची आहे.

राज ठाकरे साहेब यांची प्रतिक्रिया म्हणजे सर्वसामान्य हिंदू नागरिकांची भूमिका होय. हिंदुना हिंदू म्हणून घेता ना कमी वाटते ही भावना त्यांनी व्यक्त केली. हिंदू धर्मामध्ये सर्वधर्मसमभाव आहे. राज ठाकरे साहेब यांचे भाषण ऐकून काल हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. राज ठाकरे यांच्या बोलण्यातून आमच्याबरोबर आणखी कोणीतरी महाविकास आघाडी सरकारवर बोलत आहे. असे काल दिसले. कारण जातीयतेढ वाढण्याच्या भीतीने हिंदू दाबला गेला आहे. सगळा विचार केवळ हिंदूनी केला पाहिजे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित करत हा देश हिंदूंचा आहे. याठिकाणी नंतर मुस्लिम आले. सर्वांनी गुण्यागोविंदानं राहिले पाहिजे. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. हिंदुनी कधी दुसऱ्या देशात जाऊन आक्रमण केले का? मुस्लिमांनी सगळीकडे आक्रमण केले. मुस्लिमांनी मूर्ती आणि महिलांना भ्रष्ट केले असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

युपीए आघाडीच्या अध्यक्षपद घेण्यावरून शरद पवार यांनी नकार दिल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यावर निशाणा साधला. बुडत्या जहाजांचे कॅप्टन पद कोण घेणार? म्हणून यूपीएच्या अध्यक्षपदी घेण्यास शरद पवार यांचा नकार आहे. असे पाटील म्हणाले. सध्या राष्ट्रवादी शिवसेना संपवत आहे. असे बराच वेळ आम्ही सांगितले आहे. पण केवळ आम्हीच बोलत नसून आता राज ठाकरे यांनी देखील म्हटले आहे.

भाजप प्रत्येक निवडणुकीत बी टीम घेऊन उतरते. असा आरोप महाविकासआघाडीतील नेत्यांनी केला आहे. त्याला उत्तर देताना, चंद्रकांत पाटील म्हणाले 2019 साली राज ठाकरे यांनी केवळ लाव रे तो व्हिडिओ म्हणून सभा घेतल्या. त्या सर्व शरद पवार यांनी करायला लावल्या होत्या. त्यावेळी मनसे तुमची बी टीम होती का? आम्हाला बी टीम घेऊन राजकारण करण्याची सवय नाही. असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Related Stories

कोल्हापूर : सीपीआरमधील ‘ट्रॉमा केअर वाॅर्ड’मध्ये आग

Archana Banage

कुंभोज येथे घर फोडले; दागिने केले लंपास

Abhijeet Khandekar

भाजपला शिवसेनेची चिंता का ?; तर शरद पवार ‘जरा शहाण्या माणसाबद्दल विचारा’ असे का म्हणाले?

Archana Banage

सरकारी, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी कोविड रूग्णांसाठी बेड आरक्षित ठेवा : आरोग्यमंत्री

Archana Banage

परप्रांतीय चोरट्यांकडून दीड कोटीचे मोबाईल जप्त

datta jadhav

महाकवी कालिदासांवरच्या ‘रस परमेश कवी’ नाटय़ाला प्रेक्षकांची दाद

Patil_p