Tarun Bharat

२०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे ध्येय – डॉ. अर्चना पाटील

सांगली / प्रतिनिधी

कोरोना रुग्णांमध्ये झालेल्या वाढीमुळे आरोग्ययंत्रणेसमोर अभूतपूर्व आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः क्षयरोग कार्यक्रमावर याचा परिणाम झाला आहे. तरीही गरजूंना क्षयरोग उपचारासाठी क्षयरोग कार्यक्रमाने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना केल्या, असे  आरोग्य सेवा  संचालक डॉ. अर्चना पाटील व्हर्चुअल ब्रिफिंगमध्ये सांगितले.

देशभरात क्षयरोग संसर्गजन्य रोगांच्या व्यवस्थापनासह  कोविड-१९ च्या चाचण्यांसाठी क्षयरोग निदान यंत्र, सीबीएनएएटी (जेनएक्स्पर्ट आणि ट्रूनॅट) यांचा वापर करण्यात आला. पण मनुष्यबळ आणि निदान उपकरणांचा वापर कोविड-१९ ला सामोरे जाण्यासाठी करण्यात आल्यामुळे क्षयरोग सेवांवर बराच परिणाम झाला आहे. जनसामान्यांमध्ये खोकला या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या लक्षणाबद्दल असलेली भीती आणि कलंकाची भावना यामुळे सरकार दफ्तरी नोंदणी झालेल्या क्षयरुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट झाली आहे.

कोविडपूर्व काळात राज्यात दरमहा सरासरी १ हजार क्षयरुग्णांची नोंद होत होती ती कमी होऊन एप्रिल २०२१ मध्ये १०,०३६ रुग्णांची नोंद झाली. डॉ. पाटील पुढे म्हणाल्या, कोविड-१९ चा क्षयरोग उपचारसेवांवर झालेला परिणाम आणि नोंदींमध्ये झालेली घट यांची दखल घेत आम्ही क्षयरोगासंबंधीच्या सेवा सुरू राहतील याची खातरजमा करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण सौम्यकरण धोरणे विकसित केली आणि त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली. रुग्णांना घरपोच औषधे पोहचविणे, क्षयरोगाच्या निदानासाठी मदत मिळावी यासाठी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांशी भागीदारी, सामाजिक स्तरावर सहभाग या उपाययोजना राबविण्यात आल्या.

२०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे ध्येय

आम्ही लवकरच हा कार्यक्रम कोविडपूर्व पातळीवर आणू शकू आणि २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे ध्येय गाठू शकू, असा आम्हाला विश्वास आहे.”, असे राज्य क्षयरोग अधिकारी डॉ. अडकेकर यांनी सांगितले. 

Related Stories

मोफत शिवभोजन थाळी योजनेला 14 जुलैपर्यंत मुदतवाढ!

Tousif Mujawar

शिंदे-फडणवीसांचे सरकार मोदी-शाहांचे गुलाम

datta jadhav

तारीख पे तारीख ! आता फुटबॉल हंगाम या तारखेला होणार सुरु

Rahul Gadkar

अनिल देशमुखांविरोधात माफीचा साक्षिदार करा- सचिन वाझे

Kalyani Amanagi

दौरा अर्धवट सोडून नाना पटोले तातडीने दिल्लीला होणार रवाना

Archana Banage

डोक्यात दगड घालून युवकाचा खून

Patil_p