Tarun Bharat

२० हजाराची लाच घेताना तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अक्कलकोट : प्रतिनिधी

शेतातील रस्ता वहिवाटी साठी खुला करून देण्यासाठी अर्जावर सुनावणी होऊन निकाल तुमच्या बाजूने लावून देतो म्हणून वीस हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडले. समाधान बाळासाहेब काळे, वय ३३, वर्ष व्यवसाय नोकरी, पद तलाठी सज्जा खानापूर, तहसिल अक्कलकोट, रा समर्थ नगर, अक्कलकोट जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या मौजे अंकलगे येथील शेतजमिनी मधुन जाणे येण्याकरीता तसेच शेतमालाची ने आण करण्याकरीता वहीवाटी रस्ता खुला करुन मिळणेबाबत तहसिलदार कोर्ट,अक्कलकोट येथे सादर केलेल्या अर्जावर सुनावणी होवुन तक्रारदार यांच्या बाजुने निकाल लावुन सदर निकालाची प्रत देण्याकरीता समाधान काळे, तलाठी सज्जा खानापुर, यांनी २५,००० रुपयांची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता २० हजार रुपयांची मागणी केली, लाचेचे वीस हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी काळे यांना रंगेहात पकडले त्याच्या विरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई संजीव पाटील, पोलीस उप अधिक्षक अॅन्टीकरप्शन ब्युरो सोलापुर उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक, पो.ह.वा./ सोनवणे, पो.ना./ श्रीराम घुगे, पो.कों./ उमेश पवार व पो.कों./ स्वप्नील सणके, सर्व अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Stories

मुंबईत घराबाहेर पडताना मास्क न वापरल्यास होणार अटक

prashant_c

सोलापूर ग्रामीणमध्ये ५१९ तर शहरात २८ नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

Archana Banage

राज्यातील २५० हून अधिक लेखकांचा भारत जोडोला पाठिंबा; केल्या ‘या’ मागण्या

Archana Banage

सोलापुर: विषाणू प्रसार रोखण्यासाठी वैद्यकीय पथक पाठवणार

Archana Banage

गड किल्ल्यांवरील अतिक्रमणाबाबत संभाजीराजे भूमिका मांडणार

Archana Banage

पाकिस्तानचा यू-टर्न; दाऊद पाकिस्तानात नाही

datta jadhav