Tarun Bharat

२१ वर्षीय तरुणीची प्रेमवीराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

शाहुवाडी / प्रतिनिधी

कांडवण (ता. शाहूवाडी) येथील २१ वर्षीय तरुणीने स्थानिक प्रेमवीराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार शाहूवाडी पोलिसांनी अमोल संजय सुतार (रा. कांडवण, ता. शाहूवाडी) या संशयित तरुणाविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान संशयित तरुणाला शाहूवाडी-मलकापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी शनिवार (ता. २९) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व संशयित अमोल संजय सुतार हे कांडवण (ता. शाहूवाडी) येथील रहिवासी आहेत. फिर्यादी महिलेची २१ वर्षीय मुलगी आणि अमोल सुतार यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे फिर्यादीसह कुटुंबियांना समजल्यानंतर मुलीने हे प्रेमसंबंध संपुष्टात आणले होते. मात्र अमोलने प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी तगादा लावत मुलीच्या मोबाईलवर संदेश पाठवून तसेच संपर्क साधून, ‘तू माझ्याशी लग्न कर नाही तर मी जीव देईन’ असे वारंवार धमकावून मुलीला मानसिक त्रास देत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने राहत्या घरातील तुळईला गळफास लावून मंगळवारी (ता.२५) आत्महत्या केली, अशी तक्रार फिर्यादी यांनी शाहूवाडी पोलिसांत दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलजा पाटील या करत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना पुरस्कार

Archana Banage

अंतराळात काहीतरी ‘विचित्र’ घडतंय, नासाच्या हबल टेलिस्कोपने पाठवली धक्कादायक माहिती

Archana Banage

दिल्लीत मागील 24 तासात 4,525 नवीन कोरोना रुग्ण; 340 मृत्यू

Tousif Mujawar

नवज्योत सिद्धू पंजाबची राखी सावंत !

Patil_p

प्रभु राम त्यांना कधीच आशीर्वाद देणार नाहीत : संजय राउत

Rahul Gadkar

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन रद्द

datta jadhav