Tarun Bharat

२७ हजार भाविक अंबाबाई चरणी नतमस्तक

Advertisements

नवरात्रौत्सवात दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील भक्तांची उपस्थिती, मुखदर्शनाही गर्दी, उद्या ललिता पंचमी

प्रतिनिधी/कोल्हापूर

शारदीय नवरात्रौत्सवाच्या गेल्या दोन दिवसांमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचे २७ भाविकांनी ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेतलेल्यांमध्ये स्थानिकांसह सांगली, कराड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, बारामती, मुंबई, बेळगावसह कर्नाटकातील भाविकांचा समावेश होता. कोरोनामुळे भाविकांनी देवस्थान समितीने श्री अंबाबाई लाईव्ह दर्शन ऍप आणि www. mahalaxmikolhapur.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईनही दर्शन घेतले. कोरोनामुळे मुख्य दर्शन रांगेला अल्पप्रतिसाद असला तरी बिनखांबी गणेश मंदिरातून अंबाबाई मंदिराच्या महाद्वाराकडे आलेल्या मुखदर्शन रांगेला मात्र भाविकांची मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसात हजारो भाविकांनी अनेकांनी अंबाबाईचे मुखदर्शन व मंदिराचे कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानले.
उत्सवाच्या दुसऱया दिवशी सकाळी निवडक मानकऱयांच्या उपस्थितीत अंबाबाई मंदिरात परंपरेनुसार विविध धार्मिक विधी करण्यात आले. यंदाच्या नवरात्रौत्सवात सफ्तमातृका ही संकल्पना घेऊन रोज अंबाबाईच्या पूजा बांधल्या जाणार आहेत. त्यानुसार उत्सवाच्या दुसऱया दिवशी दुपारी माहेश्वरी या रुपात अंबाबाईची पूजा बांधण्यात आली. पुजारी अरुण मुनीश्वर, सोहम मुनीश्वर व सुकृत मुनीश्वर यांनी ही पूजा बांधली. तसेच तुळजा भवानी मंदिरात कमळात विराजमान झालेली भवानी माता अशी पूजा बांधण्यात आली होती. सायंकाळी पावसामुळे भाविक संख्येवर परिणाम झाला.

अंबाबाईच्या माहेश्वरी या रुपातील पूजेचे महात्म्य…
मातृका मंडलापैकी भगवान शंकरांची अर्थात महेश्वर यांची शक्ती म्हणजे माहेश्वरी. भगवान शंकर हे सृष्टी क्रमामध्ये संहाराचे दैवत. संहार हा वाईट नसतो जे निर्माण होते ते कधी ना कधी नष्ट होते आा†ण जुने नष्ट झाल्या†शवाय नव्या निर्मितीला जागा उरत नाही. भगवान शंकर कधी दैत्यांना वरदान देऊन देवांच्या दूर्गुणांचा संहार करतात. या शंकरांची मूर्तिमंत शक्ती म्हणजे भगवती माहेश्वरी. हातामध्ये शंकरांप्रमाणेच त्रिशूल अक्षमाला अशी आयुधे, नंदी वाहन, माथ्यावरती चंद्रकोर जटामुकूट, कपाळावर त्रिनेत्र अशी भगवती माहेश्वरी भक्तजनांच्या समस्त इच्छा पूर्ण करत त्यांच्या वासना वृत्तीचा संहार करते.

पोलीस, देवस्थानच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा : अंबाबाई भक्त समिती
नवरात्रोत्सव काळात दक्षिण दरवाजातून व्हीआयपी व्यक्तींना दर्शनासाठी प्रवेश देणाऱया पोलीस आणि देवस्थान समितीचे कर्मचारी यांच्यावर कर्तव्यात कसुर केल्याबद्दल गुन्हा नोंद करावा, अशी मागणी श्री अंबाबाई भक्त समितीने केली आहे. या संदर्भातील निवेदन प्रमोद सावंत, महेश उरसाल, सुनील पाटील आदींनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक दत्तात्रय नाळे यांना शुक्रवारी दिले. दक्षिण दरवाजातून दर्शनासाठी आलेल्या काही व्हीआयपी व्यक्तींची पादत्राणे मंदिराच्या आतील बाजूस असलेल्या बॅराकेटजवळ काढल्याचे दिसते. यावरून व्हीआयपी दर्शन सुरू असल्याचा संशय येतो, असे निवेदनात म्हटले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह मान्यवरांनी घेतले दर्शन
अंबाबाईच्या दर्शनाचा मान्यवरांच्या नातेवाईकांनी लाभ घेतला. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सपत्निक दर्शन घेतले. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पत्नीही दर्शनाला आल्या होत्या. त्यांच्याबरोबर असलेल्या दोन वयस्कर महिला नातेवाईकांना मात्र वयाच्या नियमावलीनुसार दर्शनास अटकाव करण्यात आला. त्यांनीही बाहेर थांबून देवस्थान समितीच्या निर्णयाचा सन्मान केला.

ललिता पंचमी रविवारी…
तिथीचा क्षय असल्याने कारणाने आणि नवरात्रौत्सवाची चतुर्थी व पंचमी एकत्र आल्याने चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी ललिता पंचमी साजरी केली जाणार आहे.

दुपारी बाराच्या सुमारास टेंबलाई टेकडीवरील टेंबलाई मंदिरात कुमारिकेच्या साक्षीने कोहळा पुजनाचा विधी केला जाईल. या विधीवेळी अंबाबाई, तुळजा भवानी माता व टेंबलाईदेवी यांच्या भेटीचा सोहळाही होणार आहे.

Related Stories

दहावी, बारावी सतरा नंबर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

Abhijeet Shinde

भुकेलेल्यांसाठी नवीन सामाजिक उपक्रम : ‘ओपन फ्रिज’

Abhijeet Shinde

सादळे मादळे येथे भाविकांची ट्रॉली पलटली; बावीस जखमी

Abhijeet Shinde

कुंभोज बाजार म्हणजे मोबाईल चोरट्यांची पर्वणीच पोलिसांचे दुर्लक्ष, नागरिकांतून तीव्र संताप

Abhijeet Shinde

महापूर अभ्यास समितीवर राजू शेट्टींची थेट टिका

Abhijeet Shinde

कसबा सांगाव येथे अतिक्रमण हटाव मोहिम सुरु, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Abhijeet Shinde
error: Content is protected !!