Tarun Bharat

६० लाखांची रोकड लूटप्रकरण : मुख्य सूत्रधारासह अन्य दोन साथीदार अखेर गजाआड

Advertisements

३३ लाखांचा ऐवज हस्तगत

प्रतिनिधी / खेड

स्वस्त दरात दोन किलो सोने देण्याच्या आमिषाने चौघांना चाकूचा धाक दाखवत ६० लाखाची रोकड लूटणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार किशोर पवारसह अन्य दोन साथीदारांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने मुसक्या आवळल्या. लुटीतील रोकडपैकी २८ लाखाची रोकड, कार, मोबाईलसह ३३ लाख ९ हजार ४४० रूपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

सत्यवान जनार्दन साळुखे ( २९, श्रीवर्धन-रायगड ), सचिन लहू जाधव ( ३०, पानशेत पुणे ) अशी अन्य साथीदारांची नावे आहेत. १६ सप्टेंबर रोजी महामार्गावरील उधळे-कामाक्षी पेट्रोलपंपानजीकच्या जंगलमय भागात घडलेल्या ६० लाखाच्या लुटीनंतर येथील पोलिसांनी अवघ्या काही तासातच टोळीतील विक्रम वसंत चव्हाण, सिद्धेश विठ्ठल पवार या दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. यानंतर मुख्य सूत्रधारासह फरारीच्या शोधार्थ स्थानिक पोलिसांची दोन पथके व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची पथके ठिकठिकाणी रवाना झाले होते.

येथील पोलिसांच्या पथकाने ५ जणांच्या रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील जंगलमय भागात मुसक्या आवळल्या होत्या. तर एकास मंडणगड येथून जेरबंद करण्यात आले होते. या टोळीकडून दोन लाखाच्या रोकडसह अल्टो कार व पाच दुचाकी जप्त केल्या होत्या. मुख्य सूत्रधारासह अन्य दोन फरारीच्या शोधार्थ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची पथके सातारा, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, कर्नाटक याठिकाणी जंगजंग पछाडत होते. १ ऑक्टोबर रोजी मुख्य सूत्रधार किशोर पवार दोन साथीदारांसह गोव्याला जाणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून थरारक पाठलाग करत तिघांच्याही मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली.

Related Stories

सेवा व मदत कार्याच्या अहवालाच्या ’प्रचिती’ या ई-बुकचे जिल्हाध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन

Patil_p

मंडणगडात अडीच हजार नागरिकांना स्थलांतराचे आदेश

Patil_p

रत्नागिरी : आरवली ते वाकेड चौपदरीकरण खटला जनहितार्थ उच्च न्यायालयात

Abhijeet Shinde

सिंधुकन्या श्रावणी घारकर लीलावती रुग्णालयात कोरोना योद्धा

NIKHIL_N

लॉकडाऊनच्या काळात जाधव कुटुंबीयांनी खोदली 55 फुट विहीर

Patil_p

कुणकेरीच्या डॉ. संजय परब दाम्पत्याने घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

NIKHIL_N
error: Content is protected !!