Tarun Bharat

७ ऑक्टोबर पासून मंदिरे व धार्मिक स्थळे उघडणार, सरकारने जाहीर केली नियमावली!

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray Chief Minister of Maharashtra) यांनी घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं आजच घेतला.

दरम्यान, कोरोनामुळे राज्यातील मंदिर (temple) आणि सर्व धार्मिस स्थळं बंद होती. मंदिर कधी खुली करण्यात येणार याकडे सर्व राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. अखेर राज्य सरकारने राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या (Navratri 2021) पहिल्या दिवसापासून म्हणजे येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे (multi religious places) आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून (cm office) माहिती देण्यात आली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अशामध्ये राज्य सरकारने सर्व धार्मिक स्थळं, त्यांची ट्रस्ट मंडळी आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कोणते नियम पाळावे यासाठी नियमावली जाहीर केली आहे.

सरकारने धार्मिकस्थळांसाठी नियमावली (guidelines) जाहीर –

 1. धार्मिक स्थळांनी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर तसेच स्क्रिनिंगची व्यवस्था करणे अनिवार्य आहे.
 2. ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत फक्त अशाच व्यक्तींना धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रवेश मिळणार
 3. ज्यांनी मास्क घातलेला आहे किंवा तोंड झाकलेले आहे त्यांनाच धार्मिक स्थळात प्रवेश दिला जाणार.
 4. कोरोना रोखण्यासाठी सुचना देणारे फलक लावणे अनिवार्य आहे. तसंच ऑडिओ व्हिडीओही धार्मिक स्थळांमध्ये टाईम टू टाईम लावले जावेत.
 5. एखाद्या मंदिरात, धार्मिक स्थळात एकाच वेळी किती जणांना प्रवेश द्यायचा ते ट्रस्टने ठरवावे.
 6. प्रत्येकाने बुट, चप्पल आपल्या गाडीमध्येच काढाव्यात. कुटुंबियांनी आणि प्रत्येकानं ते स्वतंत्र ठेवावेत.
 7. धार्मिक स्थळाच्या परिसरातील दुकानं, कॅफेटेरिया, स्टॉल्सनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
 8. येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी प्रॉपर मार्किंग करावे.
 9. धार्मिक स्थळांमध्ये आत आणि बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग असावेत.
 10. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करताना दोघात कमीत कमी 6 फुटाचं अंतर असावे. याची जबाबदारी धार्मिक स्थळांच्या मॅनेजमेंटची असेल.
 11. धार्मिक स्थळात प्रवेश करण्यापूर्वी लोकांनी साबनाने हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा.
 12. बसताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. परिसरात जास्तीत जास्त मोकळी हवा राहील याची काळजी घ्यावी. एअर कंडिशन 24 ते 30 अंश सेल्सिअस एवढे ठेवावे.
 13. मूर्ती, धार्मिक ग्रंथ, पुतळे यांना हात लावता येणार नाही.
 14. धार्मिक स्थळांवर कुठलंही मोठे कार्य ज्यामुळे गर्दी होईल असे करता येणार नाही.
 15. भजन, कीर्तन किंवा इतर धार्मिक गायन पूर्णपणे बंद असेल. पण धार्मिक गीतं वाजवता येतील.
 16. कॉमन प्रार्थना चटई टाळावी. भक्तांनी त्यांची स्वत:ची चटई किंवा तत्सम कापड सोबत घेऊन यावे.
 17. धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद वाटणे, तुषार शिंपडणे अशा गोष्टी पूर्णपणे बंद असतील.

Related Stories

सात जणांच्या चोरट्यांच्या टोळीला भुदरगड पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक

Sumit Tambekar

गायरान कोणत्याही परिस्थितीत काढू देणार नाही-सतेज पाटील

Archana Banage

टोळधाड : पुढील चार आठवडे भारताला अतिदक्षतेचा इशारा

datta jadhav

अब्दुल लाटच्या कन्येची पॅरिस मधील भारतीय दूतावासमध्ये द्वितीय सचिवपदी नियुक्ती

Abhijeet Shinde

चित्रा वाघ म्हणतात, क्या हुवा तेरा वादा….जयंतरावजी..

Abhijeet Shinde

दिवाळी शिध्याचे वितरण ऑफलाइनच देणार; मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!