Tarun Bharat

८0 कोटी रुपये दूध दर फरक दिवाळीपूर्वी देणार : गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे

Advertisements

कार्वे / वार्ताहर

कोरोना महामारी मुळे सर्वच उद्योग संकटात सापडले आहेत. अतिरिक्त दुधामुळे गोकुळ दूध संघाला सुद्धा कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला आहे. तरीसुद्धा दूध व्यवसाय हा एकमेव उत्पन्नाचं साधन असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाचे नुकसान होऊ नये यासाठी संस्था कर्मचारी, पंचकमिटी, संघाचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या सार्वजनिक प्रयत्नामुळे गोकुळने एक वेळ सुद्धा या कालावधीमध्ये दूध संकलन बंद केले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न गोकुळ नेहमी केला आहे. दिवाळीपूर्वी दूध दर पत्रक ८० कोटी रुपये उत्पादकांना देणार असून डिव्हिडंड सुद्धा वेळेत देण्याचा प्रयत्न करु, असे प्रतिपादन गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे यांनी केले.

तावरेवाडी येथील दूध शीतकरण केंद्रावर तालुकास्तर व जिल्हा स्तरावरील जास्तीत जास्त दूध उत्पादन संस्था व उत्तम प्रतीच्या संस्थांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक दीपक पाटील यांनी करून चंदगड तालुक्यातील दुग्ध व्यवसायाचा आढावा घेतला. कोरोना महामारी च्या कालावधीत चंदगड तालुक्यातील दूध संस्थांनी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

प्रारंभी तावरेवाडी दूध केंद्राकडील कर्मचारी शिवाजी भेकणे, दूध संघाचे अनेक उत्पादक, संस्था कर्मचारी, संघाशी संलग्न असलेले ज्ञात -अज्ञात, कोरोनामुळे मृत्युमुखी पडले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चेअरमन रवींद्र आपटे पुढे म्हणाले, संघाने २५ लाख रुपयाचे सॅनिटायझर सर्व दूध संस्थांना वाटप केले.  कणेरीच्या सिद्धगिरी हॉस्पिटल ला दोन व्हेंटिलेटर दिले. मुख्यमंत्री सहाय्यता  निधीला संघाने व कर्मचाऱ्यांनी मिळून ५१ लाखांची देणगी दिली. गोकुळ लोकहिताच्या बाबतीत कधीही मागे पडत नाही. सभासदांनी असाच गोकुळ वर विश्वास ठेवून संघाच्या सर्व सुविधांचा वापर करून दुग्धव्यवसाय वाढवावा असे आवाहन केले.

आमदार राजेश पाटील यांनी गोकुळची चढती कमान तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. संघाच्या सुविधा उत्पादकांपर्यंत पोचविण्याचे काम सर्वांनी करावे असे सांगून उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन निवृत्ती हरकारे यांनी केले.

यावेळी सण २०१८-१९ व सन २०१९- २० सालात जास्तीत जास्त दूध पुरवठा व उत्तम प्रतीत क्रमांक पटकाविलेल्या संस्थांना चेक, सर्टिफिकेट व गौरवचिन्ह देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार प्राप्त संस्था अशा, भैरवनाथ दुध संस्था – निट्टूर, कामधेनु- कुदनुर, भावेश्वरी- राजगोळी खुर्द, दत्तात्रय – राजगोळी बुद्रुक, लक्ष्मी -राजगोळी बुद्रुक, लक्ष्मी महिला – कुदनूर, रवळनाथ -तुर्केवाडी, कलमेश्वर -किणी, रवळनाथ – सातवणे, हनुमान महिला -कुदनुर व अहील्यादेवी महीला- राजगोळी खुर्द या संस्थांचा समावेश आहे. कार्यक्रमास शाखाप्रमुख एस. बी. चेंडके, सहाय्यक दूध संकलन अधिकारी भरत पाटील, तानाजी गडकरी, जानबा चौगुले, अनिल शिखरे, शिवाजी कलागते यांचे सह कर्मचारी व संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.Related Stories

इंग्लंडच्या रॉयल कलेक्शन ट्रस्टमधील तलवार छत्रपती शिवाजी महाराजांचीच

Archana Banage

कोल्हापूर :`रेमडेसीवीर’ची प्रतिक्षा, प्रशासनाचा पाठपुरावा

Archana Banage

दोन ठिकाणी घरफोडी सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Patil_p

धनुष्यबाण चिन्हावरून शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला; म्हणाले, …तर वेगळा पक्ष काढू शकता

Archana Banage

विधीमंडळाबाहेर भाजपने भरवली प्रति विधानसभा ; फडणवीसांनी मांडला आघाडी सरकारविरोधात धिक्कार प्रस्ताव

Archana Banage

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!