Tarun Bharat

९० वर्षाचे आजोबा अन १ वर्षाच्या बाळासह ५ जणांना सोडले घरी

सोलापुर : प्रतिनिधी

गुरुवारी ९० वर्षांचे आजोबा अन १ वर्षाच्या बाळासह एकूण ५ जणांना गुरुवारी रात्री ८ वाजता घरी सोडले असल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटलमधील वैदकीय अधिकारी डॉ. औदुंबर मस्के यांनी दिली.

१२ एप्रिल नंतर सोलापुरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. या पॉझिटिव रुग्णावर  सिविल हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. या रुग्णांच्या ५ व्या, १५ व्या आणि १६ व्या दिवशी अशा तीन टप्प्यात तीन चाचण्या घेतल्या जातात. या चाचण्या घेऊन सदरच्या रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. गुरुवारी १ महिला, १ बालक आणि ३ पुरुष अशा एकूण पाच जणांचा समावेश आहे. यापूर्वी उपचारानंतर बरे झाल्याने जवळपास २४ रूग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर औदुंबर म्हस्के यांनी दिली.

Related Stories

अक्कलकोट : शिस्तीसाठी महसूल प्रशासनाची दंडात्मक कारवाई

Archana Banage

पुणे-बेंगळूर महामार्गावर शिरोलीपासून सातारला जाणारी एकेरी वाहतूक सुरु

Archana Banage

ईडब्ल्यूएसप्रमाणे 50 टक्के आरक्षण मर्यादा उठवा

Archana Banage

कराडचा अमिर शेख एक वर्षासाठी स्थानबद्ध

Patil_p

सोलापूर : विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Archana Banage

सततच्या आजारास कंटाळून तरुणाची आत्महत्या

Archana Banage