Tarun Bharat

‌उच्च न्यायालयाची बंदी झुगारत येरळा नदीपात्रातील वाळू उपसा सुरुच

प्रतिनीधी / कडेगाव

येरळा नदीतील वाळु उपशास उच्च न्यायालयाची बंदी आहे. हा बंदी आदेश मोडीत काढत नदीतून मोठ्या प्रमाणात वाळु उपसली जाते यावर आता कडेगाव महसुल विभागाने मोठी कारवाई करीत वांगी, शेळकबाव, नदी पात्रात जाणारे रस्ते पुन्हा बंद केले आहेत. परंतु पहिली चर मुजविणारे तस्करांवर कारवाई करण्यात आली नाही. या चरी कोण मुजवणार नाही याची खबरदारी घेण्यात येत असुन नदीचे पंचनामे करुन तस्करीस रस्ता देनाऱ्यावरही कडक कारवाई करण्याचे आदेश तहसिलदार डॉ.शैलजा पाटील यांनी दिले आहेत.

वांगी तलाठी डी.एल.चैरे यांनी नदी पाञात जाणारे रस्ते जेबीच्या सह्यायाने चरी मारुन बंद केले आहेत. येरळा नदीतून तालुक्यातील वांगी शिवणी नेवरी शेळकबाव रामापुर कान्हरवाडी येतगाव तुपेवाडी या गावातील हद्दीत मोठ्या प्रमाणात वाळु तस्करांनी उच्चाद मांडला आहे.
कडेगाव तालुक्यात ताकारी टेंभु योजनेचे पाणी आल्याचे आर्थिक सुबत्ता वाढली आहे. यातुन मोठ्या प्रमाणात इमारत बांधकामे सुरू आहेत. अनेक शासकिय कामेही आहेत, यासाठी मोठ्या प्रमाणावर माती विरहित उच्च दर्जाच्या येरळा नदीच्या वाळुची मागणी होते.

खार्चापेक्षा दहा पट जादा पैसे वाळु तस्करांना मिळत आहेत रात्रभर वाळु चोरत दिवसा आलीशान गाडीतुन फिरणाऱ्या वाळु तस्करांचा तरूणाईवर प्रभाव असल्याने अनेक तरूण शाळा सोडत वाळु तस्करी करीत आहेत. यातुन गुन्हेगारीत वाढ झाली आहे. वाळुच्या वाहनाने आता पर्यंत तालुक्यातील पंधरा बळी गेले आहेत.

गुन्हे दाखल करणार…

वाळु तस्करी बाबत तक्रारी प्राप्त होत आहेत महसुल विभागातील तलाठी व पोलीस प्रशासनास तस्करांवर गुन्हे दाखल करन्याचे आदेश दिले आहेत .नदीपाञात चरी मारण्याचे काम सुरु आहे. कोनाचीही गय केली जानार नाही.चोरीची वाळु कोनीही खरेदी करु नये गावा गावातील वाळु साठ्याचे पंचनामे करन्याचे आदेशही देण्यात आले आहेत.- डॉ.शैलजा पाटील- तहसिलदार कडेगाव

Related Stories

शाहुपूरीवासियांनी कोरोनाबाबत सतर्क रहावे

Patil_p

महाबळेश्वर थंडीने गारठले

Patil_p

कोल्हापूर : पेठ वडगाव येथील नगरसेवक कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

सांगलीत अग्नीशमनची प्रात्यक्षिके

Archana Banage

शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप जोशी यांचे निधन

Archana Banage

जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱयांचे काम बंद आंदोलन

Patil_p
error: Content is protected !!